३० जून रोजी कुडाळ रूग्णालयातील कोविड योद्ध्यांचा सत्कार

३० जून रोजी कुडाळ रूग्णालयातील कोविड योद्ध्यांचा सत्कार

कुडाळ :

 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना तत्परतेने सेवा देणाऱ्या कुडाळ महिला व बाल रुग्णालयातील सेंटर मध्ये डॉक्टर , टेक्निशियन, नर्सेस व अन्य कर्मचाऱ्यांचा सत्कार ३० जून रोजी सकाळी ११ वाजता कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ सुधार समितीने आयोजित केला आहे.

या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कुडाळ सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट यांनी माहिती दिली. कुडाळ महिला व बाल रुग्णालयचे रूपांतर सेंटरमध्ये केल्यामुळे तालुका व आजूबाजूची गावे या रुग्णांवर चांगल्या प्रकारे उपचार केले गेले. या रुग्णालयाला सुमारे अडीच महिने पूर्ण झाले या दरम्यान उपलब्ध डॉक्टर, टेक्निशियन, नर्सेस व इतर कर्मचाऱ्यांनी केलेली रुग्णांची सेवा कौतुकास्पद आहे.

सामाजिक बांधिलकीतून त्यांच्या कार्याची दखल घेऊन या सत्कार कार्यक्रमाचे येथील महिला बाल महिला रुग्णालय येथे आयोजन करण्यात आले आहे. ऍड. राजीव बिले, माजी नगरसेविका उषा आठल्ये, प्रकाश कुंटे आदी उपस्थित राहणार राहावे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा