You are currently viewing शेतकऱ्यांनी बोरबेट जातीच्या बांबूची लागवड करावी – लातूरचे बांबू व्यापारी वाघे यांचे आवाहन

शेतकऱ्यांनी बोरबेट जातीच्या बांबूची लागवड करावी – लातूरचे बांबू व्यापारी वाघे यांचे आवाहन

वैभववाडी
वैभववाडी, राजापूर ,कणकवली परिसरात आढळून येणारा बोरबेट जातीचा बांबू दर्जेदार असून बाजारात मोठी मागणी आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी बोरबेट जातीच्या बांबूची लागवड करावी, असे आवाहन लातूरचे प्रसिद्ध बांबू व्यापारी वाघे यांनी केले आहे.
देविदास वाघे हे लातूर येथे बांबूचे प्रसिद्ध व्यापारी असून ते विविध ठिकाणाहून अनेक जातीचे बांबू मागवून विक्री करतात.त्यांचा कित्येक वर्षांपासून बांबू विक्रीचा व्यवसाय आहे.
ते पुढे म्हणाले,आता बांबू मागणीचा हंगाम सुरु झाला असून वैभववाडी परिसरातून आजच बोरबेट जातीच्या बांबूचा पहिला ट्रक लातूरला पोचला आहे .पुढच्या काही महिन्यात कोकणातून मोठ्या प्रमाणात बाबूंची आवक होईल असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांनी कोणत्या बाबूंची लागवड करावी? बाजारात कोणत्या बांबूला मोठी मागणी आहे ?माणगा की बोरबेट ? की आणखी इतर ?असा थेट सवाल वाघे यांना केला असता, ते म्हणाले ,बोरबेट,माणगा मुळा या जातीच्या बांबूची लागवड करावी.परंतू सर्वात चांगल्या दर्जाचा बांबू हा बोरबेट आहे.बोरबेट बांबू वैभववाडी कणकवली ,राजापूर ,आणि भोर परीसरात आढळतो.
तसेच वेल वर्णीय भाजी शेतीला बोरबेट बांबूचा टेकू दिला जातो तेव्हा तो दोन वर्षे टिकतो.पावसाच्या पाण्याने कुजत नाही.खराब होत नाही.माणगा मात्र एक वेळा उपयोगाला येतो.पुन्हा वापरता येत नाही हा बोरबेट आणि माणगा जातीच्या बांबू मधील फरक आहे त्यामुळे आमच्याकडे येणारे गिऱ्हाईक बोरबेट बांबू पसंत करतात अशी माहिती वाघे यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, बोरबेट जातीचा बांबू वैभववाडी परिसरातून लातूर येथे मागवितो. बोरबेट जातीचा एक मोठा बांबू 90 ते 100 रुपयांना विकतो.तर माणगा बांबू हा 75 रुपायांना विकला जातो .बोरबेट बांबूत गुणवत्ता चांगली असून कणखर आणि टिकावू आहे.बुरुड जातीचे लोक,फर्निचर बनविणारे लोक,बिल्डर आणि वेल वर्णीय भाजीची लागवड करणारे शेतकरी बोरबेट बांबू पसंत करतात.बोरबेट बांबूतून उत्तम अशी अगरबत्ती काडी तयार होऊ शकते असा माझा विश्वास आहे असे ते म्हणाले.
आमच्या लातूर येथे बोरबेट जातीचा बांबू होत नाही.पाऊस तसेच कोकणा सारखी सुपीक जमीन ,हवामान आमच्या येथे नाही.बोरबेट जातीचा बांबूला सध्या तरी पर्याय नाही.त्यामुळे 600 ते 700 किमी दूरवरून लातुरला हा बांबू आम्ही मागवितो.ट्रकच भाडेही जास्त असते.वैभववाडी परीसरात उत्तम बांबू मिळतो.लोकांची मागणी आहे.म्हणून एवढ्या दूरवरून बांबू मागवितो.मी स्वतः बुरुड जातीचा असून गेली कित्येक वर्षे आम्ही बांबू व्यवसायात आहोत.त्यामुळे कोणता बांबू चांगल्या दर्जाचा आणि कोणता कमी दर्जाचा हे आम्ही छातीटोक पणे सांगू शकतो असा विश्वास वाघे यांनी बोलताना व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + seven =