You are currently viewing लेखिका शोभा देशपांडे यांचे कुलाबा इथल्या महावीर ज्वेलर्स बाहेर ठिय्या आंदोलन 

लेखिका शोभा देशपांडे यांचे कुलाबा इथल्या महावीर ज्वेलर्स बाहेर ठिय्या आंदोलन 

मुंबई:

काल रात्री पासून लेखिका देशपांडे यांचे ज्वेलर्स बाहेर ठिय्या आंदोलन सुरु होत.

मराठी लेखिका शोभा देशपांडे यांनी कुलाबा इथल्या महावीर ज्वेलर्स बाहेर ठिय्या आंदोलन केले. शोभा देशपांडे या कुलाब्यातील ससून डॉक भागातील महावीर ज्वेलर्समध्ये काल दुपारी गेल्या होत्या.सराफ दुकानदार मराठीमध्ये बोलला नाही आणि मराठी बोलण्यास सांगितल्यावर शोभा यांनी त्यांना मराठीत बोलण्याची विनंती केली त्या नंतर सरफने हुज्जत घातली असा आरोप देशपांडे यांनी केलाय.

मला कानातले घ्यायचे होते. म्हणून मी महावीर ज्वेलर्समध्ये गेले. तो माझ्या हिंदीतून बोलायला लागला. मराठी तूला बोलता येत नाही. तू दुकान कसं उघडलं ? असा प्रश्न देशपांडे यांनी विचारला. तुम्हाला हिंदी बोलता येत नाही, तुम्ही मराठीत बोलता म्हणून मी तुम्हाला रिंग विकणार नाही असे दुकानदार म्हणाला.

दरम्यान शोभा देशपांडे यांची भूमिका कौतूकास्पद असून काही वेळात आपण तिथे पोहोचत असल्याचे खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोभा देशपांडे यांच्या सोबत फोनवरून संवाद साधल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.

ही बातमी कळताच मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि मनसे पदाधिकाऱ्यांनी ज्वेलर्स इथे जाऊन त्यांची भेट घेतली.

शोभा देशपांडे यांच्या या ठिय्या आंदोलनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेतली होती. जवळपास वीस तास चाललेल्या या नाट्यानंतर आता सदर सराफी दुकानाचे मालक शंकरलाल जैन यांनी देशपांडे यांची माफी मागितली. त्यांनी आपला जन्म मुंबईतच झाला असल्याचे सांगून त्यांना मराठी येत असल्याचेही सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + sixteen =