*व्हेल माशाच्या उलटीची तस्करी*
संरक्षित प्राणी असलेल्या व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अटक करण्यात आली. यामध्ये बडतर्फ मुंबई पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी लोअर परेल येथे ही कारवाई केली. व्हेल माशाची उलटी ७ किलो ७५० ग्रॅम वजनाची असून त्यांची आंतरराष्ट्रीय बाजारात ७ कोटी ७५ लाख रुपये किंमत असल्याचे सांगण्यात आले. व्हेल माशाच्या कायद्याने बंदी असलेल्या उलटीची ( समुद्रातील तरंगते सोने ) विक्री करण्यासाठी काही जण लोअर परेल, सिताराम मिल, कंपाऊंड , लोढा एक्सलेस या ठिकाणी येणारे असल्याचे समजले होते . या माहितीनुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. अटक केलेले दोघे रायगड जिल्ह्यातील आहे.