You are currently viewing मालवणातील २१ तर वेंगुर्लेतील ४८ गावांचा डोंगरी विभागात समावेश – प्रभाकर सावंत

मालवणातील २१ तर वेंगुर्लेतील ४८ गावांचा डोंगरी विभागात समावेश – प्रभाकर सावंत

मालवणातील २१ तर वेंगुर्लेतील ४८ गावांचा डोंगरी विभागात समावेश – प्रभाकर सावंत

मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, वेगळा निधी मिळणार…

सिंधुदुर्गनगरी

राज्य शासनाने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील ७७ तालुके डोंगरी म्हणून नव्याने घोषित केले आहेत. याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला झाला आहे. आतापर्यंत एकही गाव डोंगरी नसलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील ४८ तर मालवण तालुक्यातील २१ गावांचा डोंगरी विभागात समावेश करण्यात आला आहे. यामुळे येथील विकासासाठी स्वतंत्र निधी तसेच शिक्षणामध्ये मुलांना २ टक्के आरक्षण मिळणार आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात जिल्हाध्यक्ष सावंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई, सरचिटणीस प्रसन्ना कुबल आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रीतेश राऊळ उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना सावंत यांनी १३ मार्चला राज्य शासनाच्या मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी राज्यातील ७७ तालुक्यांचा डोंगरी विभागात पूर्णपणे समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सिंधुदुर्गातील असंख्य गावांचा समावेश झाला आहे. त्यामुळे जिल्हा भाजपच्या वतीने महायुती सरकारचे आम्ही आभार व्यक्त करत आहोत, असे सांगितले.

यावेळी पुढे बोलताना श्री सावंत यांनी जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामधील एकाही गावाचा डोंगरी विभागामध्ये समावेश नव्हता. वेंगुर्ला तालुक्यातील गावांचा डोंगरी विभागात समावेश करावा, अशी मागणी कै. पुष्पसेन सावंत आमदार असल्यापासून झालेल्या प्रत्येक आमसभेत ठराव घेऊन करण्यात आली होती. परंतु या मागणीला यश येत नव्हते. मात्र राज्यात कार्यरत महायुती सरकारने वेंगुर्ले तालुक्याला न्याय दिला आहे. तालुक्यातील 48 गावांचा डोंगरी विभागात समावेश केला आहे. तसेच मालवण तालुक्यातील 21 गावांचा नव्याने डोंगरी विभागात समावेश करण्यात आला आहे, असे सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + ten =