वागदे येथील महामार्गावर कंटेनर पलटी; चालक गंभीर

वागदे येथील महामार्गावर कंटेनर पलटी; चालक गंभीर

वागदे पेट्रोल पंपासमोर कंटेनर पलटी होवून भीषण अपघात

कणकवली
येथील वागदे पेट्रोल पंप व गोपुरी आश्रमाच्या समोर बुधवारी मध्यरात्री सुमारे १२:३० वा ते १:०० वा च्या सुमारास हायवेवर माल वाहतूक करणारा (RJ 23 GB1521) हा कंटेनर पलटी झाला. चालकाला या वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला असावा अशी, शक्यता वर्तवली जात आहे. अपघात एवढा भीषण होता की, अपघात चालकाच्या जीवावर बेतला. चालकाचा पायाला गंभीर दुखापत झाल्याचे समजत आहे. हा अपघात मध्यरात्री घडल्याने अधिक माहिती समोर येऊ शकली नाही. हायवे प्राधिकरणाने वागदे पेट्रोल पंपासमोरचे वळण अत्यंत चुकीच्या पद्धतीने ठेवल्याने चालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे आणि काही वेळा आशा प्रकारच्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे.

राज्यात केलेल्या जमावबंदी व संचार बंदी आदेशानुसार महामार्ग पोलीस पेट्रोलिंग साठी फिरत असताना अपघात झाल्या बाबत माहिती मिळाली. त्यावेळी पोलीस तातडीने तिथे हजर झाले व अपघातग्रस्थाना तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविल्याची माहिती पोलीस कॉन्स्टेबल सुमित चव्हाण यांनी दिली. यावेळी पोलीस हवालदार रविकांत झरकर, पोलीस नाईक, किशोर पाडावे व पोलीस कॉन्स्टेबल सुमित चव्हाण महामार्ग पोलीस व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले

प्रतिक्रिया व्यक्त करा