You are currently viewing स्मृति भाग ७०

स्मृति भाग ७०

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख लिखित अप्रतिम लेख*

 

 *स्मृति भाग ७०*  

 

समग्र भारत वर्षातील वेदविदांस मी कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुखचा सविनय , सादर , साष्टांग प्रणिपात .

आज पण गौतम स्मृतिमधील अध्याय चार मधील विवाह वर्णन पाहू .

विवाह वर्णना आगोदर थोडा वेगळा विचार . वर्ण कुठलाही असो , ब्राह्मण — क्षत्रिय — वैश्य वा शूद्र , प्रत्येक वर्णात मेष राशीपासून मीनराशीपर्यंत प्रत्येक राशीत जन्माला आलेली मुले आहेत . पैकी मीन , वृश्चिक व कर्क राशीची अपत्ये विप्र वर्णाची असतात . मेष , सिंह आणि धनु राशीची अपत्ये क्षत्रिय वर्णाची असतात . वृषभ , कन्या व मकर राशीची अपत्ये वैश्य वर्णाची असतात . मिथुन , तुला व कुंभ राशीची अपत्ये ही शूद्र वर्णाची असतात . आता राशींना वर्णात का विभागले गेले ? मुळात वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था ह्या आहारविहाराची आवडनिवड , कर्मप्रवृत्ती व वृत्ती यावर आधारित पडून नंतर ती कायम स्वरुपी रुढ होत गेली . पण विप्रवर्णातही मिथुन , तुला व कुंभ राशीची मुले जन्माला येतातच ! ती विवाह दृष्टीने शूद्रवर्णाचीच गणली जातात !!!! पण आजची परिस्थिती आमची वेगळी आहे . आम्हाला अक्कल जास्त व बुध्दि कमी !!!! अशा परिस्थितीत ऋषिंचे ऐकतो कोण ? ऋषिंची इच्छा सर्वांनी उत्तरोत्तर वैचारिक उन्नति व दैवीवृत्तीने राहून जीवनाची सार्थकता अनुभवावी व पुढे जन्माला येणार्‍या पिढीस दैवी आदर्श ठेवावे , ही होती . म्हणून जन्माला येणार्‍या जीवाचे वर्गीकरण करणे , त्याच्या वृत्तीचे वर्णन करुन त्याला सन्माननीय वर्णवृत्तीत आणण्यास व अध्यात्म आणि विज्ञान मिळून होणार्‍या धर्माचा अत्युच्च बिंदू गाठून जीवनाचा गर्व व्हावा , अशा मानसिक वृत्तीपर्यंत प्रत्येकास आणावे ही इच्छा !!! पण आम्ही पडलो अक्कलवान !!! वेद वाचून काय मिळेल ? स्मृति वाचून काय मिळते ? फक्त खायला काय मिळेल याचाच विचार ? तो तर जनावरं पण करतात !!

*आहार , निद्रा , भय आणि मैथुन हा विचार पशु पण करतात . पण धर्माचा विचार वेगळा आहे . जो धर्माचा विचार करतच नाही , तो पशुसमानच असतो . अशी सुभाषिते ही आहेत .*

उन्नति व उत्कर्ष म्हणजे फक्त पैसा नाही . असो . तर उन्नत जीवनाचे आदर्श स्थितीची साध्यता साधण्यासाठीच या व्यवस्थांची निर्मिती होती व आहे . म्हणून विवाहसुध्दा नियमाधीनच व्हावेत , ही इच्छा . आजकाल आंतर धर्मीय व आंतर जातीय विवाह होण्यास जे प्रोत्साहन समाजातील राज्यव्यवस्था व न्यायव्यवस्थेकडून दिले जाते वा या आगोदर दिले गेले , त्यांचा उद्देश एकमेव भारत धर्म नष्ट करणे हाच आहे . भारत देश , संस्कृति व धर्म यांचे विरोधात बोलणारी व काम करणारी राज्यव्यवस्थेतील निवडली गेलेली माणसं वा न्यायव्यवस्थेतील पदाधिकारी ही सगळी हिरण्यकश्यपूची संतान वाटते ! *”ज्याला नारायणाचे नाव घेणारा स्वतःचा पुत्र प्रल्हादही नकोसा होता!!!!!”*

आता विवाहवर्णन उद्या पाहू .

सुंदर आहेत ना स्मृति ? तशा सर्वच स्मृति वाचनीयच आहेत , चिंतनीय आहेत , मननीय आहेत आणि प्रवचनीय ही आहेत . वाचाल ना स्मृति ? 🙏🙏

🙏🙏

इत्यलम् ।

🙏🙏🚩🚩🙏🙏🚩🚩

*लेखनधर्म—कविवर्य वैद्यराज भूपाल त्र्यंबक देशमुख .*

पिंपळनेर ( धुळे ) ४२४३०६

९८२३२१९५५०/८८८८२५२२११

प्रतिक्रिया व्यक्त करा