म्हाडा आत्ता मुंबई – ठाण्यात परवडणाऱ्या दरात घर उभारणार

म्हाडा आत्ता मुंबई – ठाण्यात परवडणाऱ्या दरात घर उभारणार

मुंबई :

मुंबईसारख्या शहरात आपले घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. अनेकांचं हे स्वप्न पूर्ण होतं, तर अनेकांच्या पदरी निराशा येते.
हेच स्वप्न साकारण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

म्हाडातर्फे मुंबई-ठाण्यात परवडणाऱ्या दरातील घरं उभारणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
पूर्व उपनगरातील टागोरनगर आणि कन्नमवार नगर या भागात मोठ्या वसाहती उभारण्यात येणार आहेत. याबद्दल जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे.

मुंबईतील रिकाम्या जमिनींविषयीचे खटले न्यायप्रलंबित आहेत. अशा जमिनी ताब्यात घेऊन त्यावर ही घरे बांधण्यात येतील असेही आव्हाड यांनी सांगितले. या मुळे सर्व सामन्यांना परवडणाऱ्या दरात स्वतःच घर उपलब्ध करून देता येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा