बांदा येथे गोडाऊनला लागलेल्या आगीत ८० लाखाचे नुकसान…

बांदा येथे गोडाऊनला लागलेल्या आगीत ८० लाखाचे नुकसान…

बांदा

येथील उद्योजक भूषण व प्रवीण शिरसाट यांच्या फर्निचर गोडाऊनला लागलेल्या आगीत सुमारे ८० लाखांचे नुकसान झाले आहे.यावरचा पंचनामा तलाठी वर्षा नाडकर्णी यांनी केला,अशी नोंद तहसीलदार कार्यालयात करण्यात आली आहे.श्री शिरसाठ यांच्या गोडाऊनला काल रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली होती. बांद्यातील ग्रामस्थांनी प्रसंगावधान दाखवत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.कुडाळ एमआयडीसी च्या अग्निशमन दलाच्या सायने रात्री आग विझवण्यात यश मिळाले.या आगीत सुमारे ऐंशी लाखाचे नुकसान झाले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा