सिंधुदुर्गात पुन्हा कडक निर्बंध

सिंधुदुर्गात पुन्हा कडक निर्बंध

सिंधुदुर्ग :

कोरोना रुग्ण संख्या कमी होत नसल्याचे तसेच डेटा प्लसचे आणि तिसरा लाटेचे आव्हान कायम असल्याने राज्य सरकारने सिंधुदुर्ग सह राज्यात सोमवारपासून कडक निर्बंध लावण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. राज्यातील कोरोना स्थितीनुसार पहिला आणि दुसरा स्तर रद्द करण्यात आला असून तिसरा चौथा आणि पाचवा स्तर कायम ठेवण्यात आला आहे.

यामुळे तिसऱ्या-चौथ्या स्तरातील जिल्हे त्याच स्तरात राहणारा हे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी याबाबतचा आदेश जारी केला. मागील आठ दिवसांपासून राज्यात कोरोना  रुग्ण संख्या कमी होणे अपेक्षित असताना ती स्थिर राहिली. किंबहुना त्यात किंचित वाढ झाली आहे. सोबतच या राज्यात डेल्टा  व डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने राज्यात संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने येत्या सोमवारपासून पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा