वैभववाडी बौध्द सेवा संघाच्या अध्यक्षा शुभांगी यादव यांचं निधन

वैभववाडी बौध्द सेवा संघाच्या अध्यक्षा शुभांगी यादव यांचं निधन

वैभववाडी

वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्या ग्रामीण शाखेच्या अध्यक्षा शुभांगी ऊर्फ माई सुर्यकांत यादव वय ६७ (रा.नाधवडे बौध्दवाडी ) यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान मुंबई येथे निधन झाले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय क्षेत्रात काम करत असता त्यांनी स्वतःचे वेगळे अस्वित्व निर्माण केले होते. त्यामुळेच वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाच्या अध्यक्षपदी त्यांची एकमताने निवड करण्यात आली होती. वैभववाडी तालुक्यातील महिलांच्या न्याय हक्कासाठी निर्माण केलेल्या माता रमाबाई महिला मंडळाच्या अध्यक्षा म्हणून काम करीत होत्या.त्यांना आदराने सर्वजन माई म्हणत असतं याच नावाने त्या सर्वञ परिचीत होत्या.त्यांच्या आकस्मिक निधनाने जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.तसेच वैभववाडी तालुक्यात शोककळा पसरली आहे.

त्यांना समाजसेवेचा वारसा त्यांचे वडील आंबेडकरी चळवळीतील जेष्ठनेते दिवंगत राम माईणकर यांच्याकडून मिळाला होता.तसेच वैभववाडी तालुका बौध्द सेवा संघाचे मुंबई अध्यक्ष यशवंत यादव यांच्या त्या वहीनी होतं.त्यांच्या पश्चात तीन मुलगे,सुना नातंवडे असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा