You are currently viewing प्रगतशील शेतकरी रामचंद्र गोलतकर यांचे निधन

प्रगतशील शेतकरी रामचंद्र गोलतकर यांचे निधन

मालवण तालुक्यातील वेरली मुणगेकरवाडी येथील रहिवासी तसा प्रगतशील शेतकरी रामचंद्र पुंडलिक गोलतकर वय वर्षे ७२ यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी सकाळी जिल्हा रुग्णालयात निधन झाले.

 

गोलतकर हे वेढली परिसरात होणाऱ्या धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात सक्रिय सहभागी व्हायचे. परिसरात ते भावोजी या टोपण नावाने प्रसिद्ध होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, जावई, दोन भाऊ, भावजय, पुतण्या, पुतणी, नातवंडे असा परिवार आहे. येथील सामाजिक कार्यकर्त्या व प्रगतशील शेतकरी सीता गोलतकर यांचे पती होत. तर मालवण येथील महावितरण कर्मचारी अशोक उर्फ पांडू गोलतकर यांचे ते वडील होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × three =