वेंगुर्ला येथील रुग्णालय लोकार्पण कार्यक्रमाला काँग्रेसची अनुपस्थिती

वेंगुर्ला येथील रुग्णालय लोकार्पण कार्यक्रमाला काँग्रेसची अनुपस्थिती

वेंगुर्ला

आज वेंगुर्ला येथे 60 बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. या वेळी वेंगुर्ला तालुका पंचायत समितीचे उपसभापती सिद्धेश परब व नरगपालिका विरोधी पक्ष गटनेते प्रकाश डिचोलकर यांची नावे कार्यक्रम पत्रिकेत नसल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी अघोषीत बहिष्कार आजच्या कार्यक्रमावर टाकल्याचे दिसून आले. या पत्रिकेत शिवसेनेच्या उपनगराध्यक्ष, नगरसेवक तसेच भाजपच्या दोन नगरसेवकांची नांवे होती परंतू महाविकास आघाडीची महाराष्ट्रात सत्ता असताना या सत्तेतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या लोकप्रतिनिधीनाच डावलण्यात आल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा