You are currently viewing मानसिकता चांगली ठेवून सेवा बजावणे गरजेचे

मानसिकता चांगली ठेवून सेवा बजावणे गरजेचे

हेड कॉन्स्टेबल राजन जाधव यांचे आवाहन; रापम सुरक्षितता अभियान कार्यक्रम देवगड आगारात संपन्न

देवगड

रापम सेवा बजावीत असताना आपल्या खाकी वर्दीचा अभिमान बाळगावा त्याचबरोबर सेवेवर रुजू झाल्यानंतर आपण सेवा संपवून परत येणार अशी प्रतीक्षा करणारे कुटुंबाचे भान ठेवून आपली मानसिकता चांगली ठेवून सेवा बजाविणे गरजेचे आहे.जेणेकरून आपण अधिक सुरक्षितपणे सेवा पार पाडू शकतो यासाठी व्यसनांपासून ही दूर राहणे हेही महत्वाचे आहे.असे प्रतिपादन पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव यांनी देवगड आगारात बोलताना केले .

रापम सुरक्षितता अभियान ११जाने. ते २५ जाने या कालावधीत देवगड आगारात राबविण्यात येत असून या अभियान चा शुभारंभ दीप प्रजवलन करून देवगड आगारात प्रमुख पाहुणे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव,पत्रकार दयानंद मांगले,पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र महाडिक,आगार व्यवस्थापक निलेश लाड,स्थानक प्रमुख श्रीकांत सैतवडेकर, सेवानिवृत्त कर्मचारी भाऊ मुंबरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या वेळी सहा. वाह.निरीक्षक लवू सरवदे,वहातुक नियंत्रक लक्ष्मण खरात,तुकाराम देवरुखकर,लेखाधिकारी श्रीकांत शेळके,सहा. कार्यशाळा अधीक्षक धाकु तांबे वरिष्ठ सहाय्यक कुंदा गोलतकर, कनिष्ठ सहा. योगेश पांचाळ,उपस्थित होते.
स्वागत प्रास्तविक आगार व्यवस्थापक निलेश लाड यांनी करून सुरक्षितता अभियान विषयी सविस्तर माहिती दिली.
या निमित्ताने पत्रकार दयानंद मांगले भाऊ मुंबरकर यांनी कामगारांना मार्गदर्शन केले.या निमित्ताने सुरक्षिततेची शपथ कामगार बंधूनी घेतली.
सुत्रसंचलन आभार वहातुक नियंत्रक तुकाराम देवरुखकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 10 =