You are currently viewing कणकवली उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर मनसे घंटानांद करणार – दया मेस्त्री

कणकवली उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयासमोर मनसे घंटानांद करणार – दया मेस्त्री

कणकवली

कोरोना महामारीत खाजगी कोविड केंद्र यांनी जनतेची जनतेची चाललेली लूट. या महामारीत शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जीवन आरोग्यदायी योजनेचा लाभ कोरोना रुग्ण लाभार्थी याला देण्याचे जाहीर केले, खाजगी कोविड केंद्रातील दिल्या जाणाऱ्या बेड्साहितच्या उपचाराचे शासकीय दर जाहीर केले.मात्र याची अंमलबजावणी होताना दिसत नसून जनतेची बेसुमार आवाजवी दर आकारून लुटमार चाललेली आहे.रुग्णांना बिले दिली जात नाहीत. उपचाराची फाईल दिली जात नाही.या बाबत उपविभागीय अधिकारी यांना दिनांक 3/6/2021 रोजी निवेदन देऊन संबंधित शासकीय यंत्रणेला जाग आणली. मात्र अदयापही फार काही निर्बंध आल्याचे दिसून येत नाही.खाजगी कोविड केंद्र चालक प्रमुखांवर कोणतीही कारवाई नाही.
त्यामुळे दिनांक 28/6/2021रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपविभागीय दंडाधिकारी कार्याल्यासमोर घंटा करून संबंधित शासकीय यंत्रणेंला जाग आणुन रुग्णांच्या चाललेल्या लूटमारीला नक्कीच आळा घालणार.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − fifteen =