शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी आवाहन

शॉर्ट फिल्म स्पर्धेसाठी आवाहन

सिंधुदुर्गनगरी :

केंद्र सरकारच्या जलशक्ति मंत्रालयाच्या वतीने राष्ट्रीय स्तरावरील फिल्मोंका अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील लघु फिल्म मेकर यांनी पाणी व स्वच्छता विषयावर लघु चित्रपट तयार करून 30 जून पर्यंत केंद्र सरकारच्या पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्रालय यांच्या वेबसाईटवर सादर कराव्यात, अशी माहिती जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी दिली. अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे https:// innovateindia.mygov.in/ sbmginnovationchallenge/ या वेबसाईटला भेट द्यावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा