केंद्रबांदा शाळेच्या विद्यार्थ्यांनी घरातूनच साजरा केला योगदिन

केंद्रबांदा शाळेच्या विद्यार्थ्यांनी घरातूनच साजरा केला योगदिन

बांदा

कोरोना अर्थात कोवीड १९ च्या पार्श्वभूमीवर चालूवर्षी जिल्हा परिषद केंद्रशाळा बांदा नं .१ शाळेच्या विद्यार्थ्यांनी सातवा आंतरराष्ट्रीय योगदिन घरातूनच साजरा केला.
सन २०१५पासून आंतरराष्ट्रीय योगदिनाची सुरवात करण्यात आला असून ,शाळांचे नविन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर लगेचच येणारा हा दिवस मोठ्या उत्साहाने शाळांतून साजरा करण्यात येतो.
पण यावर्षी योगदिन विद्यार्थ्यांनी आपल्या घरातच कुटुंबियांसोबत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून योगाभ्यास करण्याचे आवाहन बांदा शाळेच्या वतीने करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला.
घरात राहून योगाभ्यास केल्याने संसर्गजन्य कोरोना विषाणूपासून बचाव होऊ शकतो तसेच कोरोनासदृश्य परिस्थितीमध्ये श्वसनसंस्था कार्यक्षमता वाढते,रोगप्रतिकारशक्तीची वृध्दी होऊन मानसिकदृष्टया सबळ राहण्यासाठी मदत होऊ शकते यासाठी नियमित सर्वांनी योग करणे गरजेचे आहे. हा दिवस यशस्वी राबविण्यासाठी बांदा शाळेतील शिक्षक व पालक यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा