झाराप येथे कृषी संजीवनी सप्ताह मोहीमेचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ

झाराप येथे कृषी संजीवनी सप्ताह मोहीमेचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शुभारंभ

आ. वैभव नाईक यांनी भात लावणी यंत्राद्वारे केली भातलावणी

महाराष्ट्र शासन कृषी विभाग आयोजित , कुडाळ तालुका कृषी विभाग यांच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताह मोहीम २१ जून ते १ जुलै २०२१ या कालावधीत राबविण्यात येत आहे. याअंतर्गत विविध योजनांचे मार्गदर्शन व शेतीशाळा हा कार्यक्रम आज झाराप येथे आयोजित करण्यात आला. याचा शुभारंभ आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.


यावेळी आ. वैभव नाईक यांनी स्वतः भात लावणी यंत्र चालवून भात लावणीचे प्रात्यक्षिक केले. तसेच राष्ट्रीय फलोत्पादन योजनेअंतर्गत शेतकरी शरद धुरी यांच्या शेतात बनविलेल्या शेततळीची आ. वैभव नाईक यांनी पाहणी केली.

यावेळी आ. वैभव नाईक म्हणाले, माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आणलेल्या चांदा ते बांदा योजनेचा लाभ कुडाळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात घेतला आहे. शेतीत झालेल्या यांत्रिकीकरणामुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र भात लागवडी खाली आले आहे. येत्या काही दिवसात रानभाजीचा महोत्सव आयोजित करावयाचा आहे.त्यासाठी कृषी विभागाने नियोजन करावे लागणारे सहकार्य आपण करू अशी ग्वाही आ. वैभव नाईक यांनी दिली.


यावेळी जी.प. सदस्य राजू कविटकर ,शिवसेना तालुका संघटक बबन बोभाटे, अतिरिक्त जिल्हा कृषी अधिकारी सिद्धांना म्हेत्रे, कुडाळ तालुका कृषी अधिकारी रमाकांत कांबळे,तलाठी लोबो, उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, सरपंच स्वाती तेंडोलकर, बाजीराव झेंडे, ग्रामसेवक श्रद्धा आडेलकर, अशपाक कुडाळकर, कृषीसेवक मोरे, अनिकेत तेंडुलकर, चंदू मुंडये आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा