You are currently viewing कोलगांव कुंभारवाडी येथील श्री संतश्रेष्ठ गोरोबा काका पुण्यतिथी उत्सव १८ एप्रिल रोजी

कोलगांव कुंभारवाडी येथील श्री संतश्रेष्ठ गोरोबा काका पुण्यतिथी उत्सव १८ एप्रिल रोजी

सावंतवाडी

दरवर्षी प्रमाणे कोलगांव कुंभारवाडी येथे श्री संतश्रेष्ठ गोरोबा काका यांची पुण्यतिथी उत्सव मंगळवार दिनांक १८ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी श्री संतश्रेष्ठ गोरोबा काका मुर्ती अभिषेक, पूजन त्यानंतर सत्यनारायण महापूजा दुपारी आरती, तीर्थप्रसाद महाप्रसाद, सायं ७.३० वाजता संत ज्ञानदेव वारकरी सेवा मंडळ नेमळे यांचा हरिपाठ, रात्री ९.३० वाजता बुवा अनिल पांचाळ यांचे सुश्राव्य भजन असे कार्यक्रम होणार आहे तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संत श्री गोरा कुंभार सेवा मंडळ व ग्रामस्थ कोलगांव कुंभारवाडी यांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा