You are currently viewing वेंगुर्ला मनसेच्यावतीने वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव…

वेंगुर्ला मनसेच्यावतीने वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव…

वाढीव बिलासंदर्भात विचारला जाब

वेंगुर्ला  
कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊनच्या काळात जी भरमसाठ विजबील आकारणी केली. या संदर्भात जाब विचारण्यासाठी आज वेंगुर्ला येथील महाराष्ट्र नव निर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन मुख्य अधिकारी खटावकर यांना घेराव घालत वाढीव बिलासंदर्भात जाब विचारला.
यावेळी मनसेच्यावतीने वाढीव बिलासंदर्भात खटावकर यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी वेंगुर्ला तालुका संपर्क अध्यक्ष सागर तुळसकर, तालुकाध्यक्ष सनी बागकर, उपजिल्हा मनविसे अध्यक्ष परशुराम परब, मनविसे तालुकाध्यक्ष महादेव तांडेल, उपतालुकाध्यक्ष आबा चिपकर, विभागअध्यक्ष विनायक फटनाईक, वेंगुर्ला शहराध्यक्ष अमोद नरसुले, शाखा अध्यक्ष दीपक फटनाईक, शाखा अध्यक्ष दीपक परब आदी उपस्थित होते.
तालुक्यातील जनता तुमच्या वाढीव बीला संदर्भात आमच्याकडे तक्रार घेऊन येत आहेत.

वीजबील माफी झालीच पाहीजे. लॉकडाऊनमध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या. गेले चार पाच महीने उद्योग, व्यवसाय बंद आहेत. तरी पण वितरण कंपनी सरसकट बील काढून तसेच लॉकडाऊनच्या काळात युनिटचे दर ४३ पैशाने वाढवून जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे. जर लवकरात लवकर यावर तोडगा काढुन बील माफी किंवा बीलात सुट नाही दिली तर निवेदन देऊन गप्प बसणार नाही तर कार्यालयाच्या काचा फुटतील, हे लक्षात ठेवा, असा इशाराही देण्यात आला

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × three =