You are currently viewing प.पू. राऊळ महाराज संस्थान, श्री क्षेत्र पिंगुळी येथे पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

प.पू. राऊळ महाराज संस्थान, श्री क्षेत्र पिंगुळी येथे पुण्यतिथी महोत्सवाचे आयोजन

सिंधुदुर्ग :

कुडाळ पिंगुळी येथील अवलिया संत म्हणून ख्याती असलेले श्री. प.पू.सदगुरू समर्थ राऊळ महाराज यांचा ४० वा पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री क्षेत्र पिंगुळी येथे गुरूवार दि. ३० ते ३१ जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्य उपक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून उत्सवाचे औचित्य साधून या कालावधीत श्री सग्रह अनघा दत्त अनुष्ठान ब्राम्हणांच्या हस्ते संपन्न होत आहे. पहाटे ५.३० वा. नित्य काकड आरती, सकाळी ७ ते १२ शांती पाठ, देहशुद्धी, प्रायश्चित्त विष्णु सहस्त्रनाम जप, गाऱ्हाणे, गणेश पूजन, पुण्याहवाचन, नांदीश्राद्ध, आचार्य वरण, प्राकार शुद्धी , ब्रह्मादि मंडल देवता पूजन, प्रधान देवता ( अवघा दत्त) पूजन अग्निस्थापना, ग्रहपूजन, ग्रहयज्ञ , तीर्थ प्रसाद, महाप्रसाद, सकाळी १० ते १ वाजेपर्यंत मोफत कृत्रिम जयपूर फुट मोजमाप शिबीर श्री. प.पू. विनायक ( अण्णा) राऊळ महाराज चॅरीटेबल ट्रस्ट, पिंगुळी यांच्या मार्फत व रोटरी लोककल्याण मंडळ कोल्हापूर रुग्णापयोगी साहित्य वितरण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोजमाप घेतलेल्या फुटचे वितरण दि. १३ मार्च २०२५ ला श्री. प.पू.विनायक अण्णा महाराज ८० व्या जयंती उत्सवादिवशी करण्यात येईल. यावेळी मोफत हाडांची तपासणी, मधुमेह तपासणी मकरंद पिरमल लिमिटेड व सद्गुरु राऊळ महाराज संस्थान व श्री. प.पू. विनायक अण्णा महाराज चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी यांच्या विद्यमाने करण्यात दुपारी १२. ३० वा. करण्यात येणार आहे १ ते रात्रौ १० अखंड महाप्रसाद, दुपारी ४ ते ५.३० श्री. प.पू. समर्थ सद्गुरु राऊळ महाराज महिला भजन मंडळ यांचे सुश्राव्य भजन ( सप्तसूर) अशाप्रकारे मुख्य दिवशीही भरगच्च कार्यक्रमासोबत सर्व धार्मिक विधी ग्राम पुरोहित श्री दुर्गा प्रसाद दांडेकर – पिंगुळी यांच्या अधिपत्याखाली संपन्न होतील. तरी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे श्री. विठोबा विनायक अण्णा राऊळ कार्याध्यक्ष सद्गुरु राऊळ महाराज संस्थान, श्री क्षेत्र पिंगुळी व समस्त विश्वस्त मंडळ यांनी आवाहन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा