You are currently viewing आता सर्वसामान्य रेल्वेतून प्रवास करुशकतील ? लवकरच निर्णय होण्याची शक्यता

आता सर्वसामान्य रेल्वेतून प्रवास करुशकतील ? लवकरच निर्णय होण्याची शक्यता

सर्व काही योजनेनुसार घडल्यास पुढील आठवड्यापासून ,
सर्व सामान्य जनतेला लोकलमध्ये प्रवास करण्यास परवानगी मिळू शकते.

मुंबई :

मुंबईकरांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे लवकरच राज्य सरकार सामान्य लोकांना लोकल ट्रेन ने प्रवास करण्यासाठी परवानगी देऊ शकते आतापर्यंत लोकल ट्रेन मध्ये फक्त अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्यांनाच प्रवास करण्याची परवानगी दिली होती सर्व काही योजनेनुसार घडल्यास पुढील आठवड्यापासून सर्वसामान्य लोकांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा मिळण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी covid-19 टास्क फोर्सशी यासंदर्भात चर्चा केली अधिकाऱ्यांना रेल्वेशी समन्वय साधत पुढील योजना आखण्यात सांगितले आहे पण या सोबत आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत यापूर्वीही मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेकडून असं म्हटलं गेलं होतं की ते मर्यादित कालावधीत अधिक गाड्या चालविण्याचा विचारात आहेत सध्या लोकल गाड्या केवळ अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्यांसाठी चालू असल्यामुळे आतापासून दोन प्रकारच्या खाजगी कंपन्या जसेकी वीज कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना आणि विमानांच्या देखभालीचे काम करण्यासाठी रेल्वेसेवा उपलब्ध असतील

यादरम्यान मुंबई हायकोर्टाने यापूर्वी उद्धव ठाकरे सरकारला विचारलं होतं की कोरोना साथीच्या आजारात लोकल ट्रेन सेवा किती काळ मर्यादित ठेवण्याची योजना आहे एका याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हा प्रश्न केला होता वकिलांना लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी करणारी याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली होती एकच नावे तर काही सूत्रानुसार लोकल गाड्या देखील समावेश या पद्धतीने चालविल्या जाऊ शकतात म्हणजेच पहिल्या तारखेला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिसऱ्या तारखेला एक दिवस वगळता प्रवास करण्याची परवानगी देण्यात येणार आहे तर दुसऱ्या तारखेला प्रवास करणारे प्रवासी चौथ्या तारखेला प्रवास करण्यास पात्र ठरणार आहेत या प्रणालीमुळे गाड्यांमधील गर्दी कमी होईल आणि सामान्य लोकही प्रवास करू शकतील.

नालासोपारा रेल्वे स्थानक विरार रेल्वे स्थानक आणि बोर्डवरील रेल्वे स्थानकावर लोकल गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी मिळावी या मागणीसाठी प्रवाशांना रेल्वे रोको करावं लागलं होत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 + 19 =