You are currently viewing १७ रोजी निरवडे येथील श्रीदेव भूतनाथ मंदिराचा वर्धापन दिन

१७ रोजी निरवडे येथील श्रीदेव भूतनाथ मंदिराचा वर्धापन दिन

सावंतवाडी :

 

१७ एप्रिल रोजी श्री देव भूतनाथ मंदिर वर्धापन दिनानिमित्त रात्री ८ वाजता महापुरुष कला क्रिडा मंडळ, निरवडे माळकरवाडी आयोजित नवउद्योजकांचा सन्मान होणार आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, भोसले नॅालेज सिटी अध्यक्ष अच्युत भोसले, सामाजिक कार्यकर्ते ॲंड. अनिल निरवडेकर, शिवसेना ठाकरे गट प्रमुख रुपेश राऊळ, जिल्हा बॅंक संचालक विद्याधर परब, सरपंच सुहानी गावडे आदी उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर अमोल टेंबकर प्रस्तुत व दिग्दर्शित अनिकेत आसोलकर यांचा रात्री ९ वाजता भूतनाथ रंगमंचावर ओंकार कलामंच सावंतवाडी निर्मित कलाविष्कार नृत्य नाट्य हास्य, विनोदांचा कार्यक्रम होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − seven =