You are currently viewing राजकोटात शिवपुतळा पायाभरणीत ३२ गडकिल्ल्यांवरील माती समर्पित होणार – विजय केनवडेकर, बाबा मोंडकर

राजकोटात शिवपुतळा पायाभरणीत ३२ गडकिल्ल्यांवरील माती समर्पित होणार – विजय केनवडेकर, बाबा मोंडकर

राजकोटात शिवपुतळा पायाभरणीत ३२ गडकिल्ल्यांवरील माती समर्पित होणार – विजय केनवडेकर, बाबा मोंडकर

१ नोव्हेंबरला सोहळा, रवींद्र चव्हाण, निलेश राणेंची उपस्थिती…

मालवण

मालवण किनारपट्टीवरील किल्ले राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी होत आहे. ४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे. याचे औचित्य साधून जिल्ह्यातील ३२ गडकिल्ले सोबत किल्ले शिवनेरी व किल्ले रायगड येथील माती एकत्रित करून पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मिरवणुकीने हे माती कलश पुतळा उभारणी पायाभरणी ठिकाणी अर्पण केले जाणार आहेत. १ नोव्हेंबर रोजी दुपारी हा सोहळा होणार आहे. अशी माहिती भाजपा जिल्हा उपाध्यक्ष विजय केनवडेकर व पर्यटन महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी येथे संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, गणेश कुशे, आप्पा लुडबे, पंकज सादये, पूजा सरकारे, चारुशीला आचरेकर, राणी पराडकर, महिमा मयेकर, वैष्णवी मोंडकर, प्रमोद करलकर, पंकज पेडणेकर, ललित चव्हाण, अवी सामंत, कमलेश चव्हाण, नंदू देसाई, कॅलिस फर्नांडीस, विजय चव्हाण, आदी उपस्थित होते.

शासकीय स्वरूपातील हा कार्यक्रम असणार आहे. पर्यटन महासंघाच्या संकल्पनेतून गडकिल्ल्यावरील माती पूजन करून कलशाद्वारे मालवण सागरी महामार्ग येथे आणली जाणार आहे. त्यानंतर शिवप्रेमींच्या उपस्थितीत रॅलीच्या माध्यमातून हे कलश मेढा येथे दाखल होणार आहेत. कुशे वाडा याठिकाणी स्वागत केले जाणार आहे. मौनीनाथ मंदिरात पूजन करून राजकोट येथील पुतळा उभारणी ठिकाणी ३२ किल्ल्यांवरील माती कलश आग्नेय दिशेला समर्पित केले जाणार आहेत.

सागरी पर्यटनाबरोबर मालवण येथील ऐतिहासिक पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम मैलाचा दगड ठरणार आहे. पालकमंत्री यांच्या माध्यमातून किल्ले राजकोट पुनर्जीवीत होत असल्याचा आनंद आहे. यापुढे अन्य किल्ल्यांचा अशाच प्रकारे विकास होईल. जिल्ह्यातील ३२ किल्ल्यांवरील माती कलशा सोबत महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघ यांच्यावतीने किल्ले शिवनेरी, किल्ले रायगड येथील मातीही आणली जाणार आहे अशी माहिती श्री. मोंडकर यांनी दिली.

*संवाद मीडिया*

*दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्याची सुवर्णसंधी*

तब्बल ५ लाख हून अधिक संतुष्ट आणि समाधानी कुटुंबीय वापरत आहेत टाटा नेक्सॅान
*आपण देखिल संपुर्ण स्वदेशी अभियान मध्ये सहभागी व्हा..*

*₹.८०,०००/-* पर्यन्त चा डिस्काउंट

भारतातील एकमेव चाइल्ड आणि ॲडल्ट करिता ५ ⭐ स्टार सेफ्टी रेटिंग असणारी एस. यू. वी.

आपण आणि आपले कुटुंबीय संपूर्ण सुरक्षित आहात केवळ टाटा कार्स मध्येच..!!

*आजच आपल्या नजीकच्या नजिकचे शोरुम ला भेट द्या अथवा कॅाल करा*

अथवा कॉल करा
*एस.पी. ऑटोहब*
रत्नागिरी | चिपळूण | कणकवली
*7377-959595*

ॲाफर हजर स्टॉक वर उपलब्ध

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114446/
https://sanwadmedia.com/112315/
https://sanwadmedia.com/111578/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 5 =