सावंतवाडीत सुवर्णकारांकडून आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय…

सावंतवाडीत सुवर्णकारांकडून आठ दिवस दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय…

१६ ते २३ सप्टेंबर पर्यंत दुकाने बंद रहाणार

सावंतवाडी
कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता सावंतवाडी शहरातील सुवर्णव्यावसायिकांनी बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमिवर शहरातील सोन्याची दुकाने १६ ते २३ सप्टेंबर पर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे आवाहन सुवर्णकार संघाच्यावतीने अध्यक्ष श्रीपाद चोडणकर यांनी केेले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सावंतवाडीत लॉकडाउन करावे, की करू नये यात मतभेद आहेत. व्यापारी संघटनेकडुन पाच महीने व्यावसाय बंद असल्यामुळे पुन्हा लॉकडाउन नको, अशी मागणी करण्यात आली होती. तर वाढते रुग्ण लक्षात घेता लॉकडाउन करा, अशी मागणी काही जाणकारांकडुन केली जात आहे. या पार्श्वभूमिवर आज सुवर्णकार संघटनेच्या माध्यमातून आठ दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा