सावंतवाडी-मळगाव घाटीतील राज्यमार्ग ८ दिवस बंद…

सावंतवाडी-मळगाव घाटीतील राज्यमार्ग ८ दिवस बंद…

इन्सुली, आकेरीतून देणार पर्यायी मार्ग…

सावंतवाडी

येथील मळगाव घाटीतील रस्त्याचा व मोरीचा काही भाग खचला आहे.त्यामुळे दुरूस्तीसाठी मळगाव घाटीतून जाणारा सावंतवाडी-शिरोडा हा राज्यमार्ग आठ दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.त्यासाठी नागरीक व प्रवाशांनी सहकार्य करावे,असे आवाहन सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता अनिल आवटी यांनी केले आहे.दरम्यान या रस्त्यावरून जाणाऱ्या सर्व गाड्या इन्सुली-खामदेव नाका तसेच आकेरी घाटातून वळवण्यात घेणार आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा