शेतीचे अधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कृषि संजीवनी मोहिम

शेतीचे अधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी कृषि संजीवनी मोहिम

सिंधुदुर्गनगरी

खरीप हंगाम 2021 यशस्वी करण्यासाठी व आधुनिक कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी दि. 21 जून 2021 त 1 जुलै 2021 दरम्यान कृषि संचीवनी मोहिम राबवण्यात येत आहे. या मोहिम कालावधीमध्ये संबंधित ‍ विषयाबाबत राज्यभर प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे.  गावोगावी शेतीशाळा, चर्चासत्र,‍ वेबिनार, प्रात्यक्षिके, सभा प्रशिक्षण, शिवारफेरी यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  तसेच राज्यातील रिसोर्स बँकेतील शेतकऱ्यांचे सुध्दा मार्गदर्शन या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार आहे.

या मोहिमेमध्ये पुढीलप्रमाणे मार्दगर्शन करण्यात येणार आहे. दि.21 जून 2021- BBF लागवड तंत्रज्ञान (रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान), दि.22 जून 2021 – बीजप्रक्रिया, दि.23 जून 2021 –  जमीन आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा संतुलित वापर, दि.24 जून 2021 –  कापूस एक गाव एक वाण(कापूस पिकाचे क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांसाठी) / सुधारित भात लागवड तंत्रज्ञान (भात पिकाचे क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांसाठी) / ऊस लागवड तंत्रज्ञान (ऊस पिकाचे क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांसाठी)  / कडधान्य व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्रज्ञान (कडधान्य व तेलबिया क्षेत्र असणाऱ्या जिल्ह्यांसाठी), दि.25 जून 2021 – विकेल ते पिकेल, दि.28.जून 2021 – महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड व तंत्रज्ञान प्रसार, दि.29जून 2021 – तालुक्यातील दोन पिकात उत्पादकता वाढीसाठी रिसोर्स बँकेतील शेतक-यांचा सहभाग, दि.30 जून 2021 -जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांची कीड व रोग नियंत्रणाच्या उपाययोजना, दि.1 जुलै 2021 – कृषी दिन आणि मोहिमेचा समारोप कार्यक्रम या प्रमाणे ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

सर्व शेतकरी बांधवांनी कृषि संजीवनी मोहीमेचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या वतीने सर्व शेतकरी बंधुंना करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषि सहायक तसेच नजीकच्या कृषि विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन उपसंचालक, कृषि, कृषि आयुक्तालय, पुणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा