नेमळेतील युवकाची पुणे येथे आत्महत्या

नेमळेतील युवकाची पुणे येथे आत्महत्या

सावंतवाडी

पुणे येथे नोकरीनिमित्त असलेल्या नेमळे गावातील सुशांत दशरथ राऊळ (२६, रा. गोरख्याचे गाळू) या युवकाने राहत्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. बाबू म्हणून तो परिचित होता. गेली दोन वर्षे तो पुणे येथे नोकरी निमित्त राहत होता. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण मात्र कळू शकले नाही. शुक्रवारी सायंकाळी त्याने घरी फोन लावून सर्वांनी चांगले रहा काळजी घ्या असे सांगितले होते. त्या रात्री त्याच्या सोबत त्याचा एक नातेवाईक राहिला होता.

मात्र तो सकाळी निघून गेल्यानंतर सुशांतने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत सुशांतचे पार्थिव पुणे येथून नेमळे येथे आणण्यात आले त्यानंतर आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा