You are currently viewing पहिल्या अर्जुन पुरस्काराचे मानकरी सलीम दुराणी१९६० च्या दशकात प्रेक्षकांच्या मागणीवर मारायचे षटका

पहिल्या अर्जुन पुरस्काराचे मानकरी सलीम दुराणी१९६० च्या दशकात प्रेक्षकांच्या मागणीवर मारायचे षटका

*पहिल्या अर्जुन पुरस्काराचे मानकरी सलीम दुराणी१९६० च्या दशकात प्रेक्षकांच्या मागणीवर मारायचे षटकार*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

१९३४ मध्ये अफगाणिस्तानमधील काबूल येथे जन्मलेल्या सलीम दुराणी या अष्टपैलू खेळाडूने १९६० ते १९७३ या कालावधीत भारतासाठी २९ कसोटी सामने खेळले. भारताचे माजी अष्टपैलू खेळाडू सलीम दुराणी यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. गुजरातमधील जामनगर येथे राहणारे दुराणी यांच्यावर या वर्षी जानेवारी महिन्यात मांडीचे हाड तुटल्याने त्यांच्यावर प्रॉक्सिमल फेमोरल नेलची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

साठच्या दशकातील क्रिकेटमधील मोठे स्टार अष्टपैलू सलीम दुर्राणी यांचे रविवारी वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले. गुजरातमधील जामनगर येथे ते त्यांच्या धाकट्या भावासह जहांगीर दुर्राणीसोबत राहत होते. १९६० च्या दशकात दुर्राणी तडाखेबंद क्रिकेटच्या शैलीचे मास्टर होते, जे आज लोकप्रिय आहे. ते प्रेक्षकांच्या मागणीनुसार षटकार मारायचे. अफगाणिस्तानमध्ये जन्मलेले एकमेव भारतीय क्रिकेटपटू दुर्राणी हे भारतीय क्रिकेटचे राजकुमार सलीम म्हणून नेहमीच स्मरणात राहतील.

अर्जुन पुरस्कार जिंकणारे पहिले क्रिकेटर, डावखुरे फिरकीपटू, १९६० ते १९७३ दरम्यान २९ कसोटी खेळले. यादरम्यान त्यांनी २५.०४ च्या सरासरीने एकूण १२०२ धावा केल्या. त्यांच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये एक शतक (१९६२ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध १०४) आणि सात अर्धशतके आहेत, तर गोलंदाजीमध्ये त्यांनी ७५ बळी घेतले आहेत, त्यात त्यांनी एकदा १० आणि तीन वेळा पाच बळी घेतले आहेत. यामध्ये ७३ धावांत ६ बळी ही त्यांची सर्वोत्तम कामगिरी आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० च्या ऐतिहासिक विजयात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी कलकत्ता कसोटीत आठ तर मद्रास कसोटीत दहा बळी घेतले. मार्च १९७१ मध्ये त्यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध ७ विकेट्सने विजय मिळविलेल्या दुसऱ्या डावात क्लाईव्ह लॉईड आणि सर गारफिल्ड सोबर्स यांच्या विकेट घेतल्या. लॉईड आणि सोबर्सच्या विकेट घेतल्या नसत्या तर कदाचित विजयाची गाथा लिहिणे कठीण झाले असते.

सहा फूट उंच आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या सलीम दुर्रानी यांचेही बॉलिवूडशी संबंध होते. १९७३ मध्ये आलेल्या चरित्र चित्रपटात त्यांनी अभिनेत्री परवीन बाबीसोबत मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्या सहकारी खेळाडूंना माहित आहे की ते खूप चांगले गायचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये मिमिक्रीसाठी सुद्धा ते प्रसिद्ध होते. राज कपूरच्या “गंगा मैया की सौगंध” चित्रपटातील आणि अभिनेता राजकुमारचा सुप्रसिद्ध संवाद, “ये बच्चों के खेलने की चीज नहीं, हाथ में लग जाए तो खून निकल आता है.” अनेकदा ड्रेसिंग रूममध्ये सादर करायचे.

प्रेक्षकांच्या खूप आवडत्या दुर्राणींना एकदा विचारण्यात आले होते की, प्रेक्षकांच्या मागणी केल्यावर तुम्ही त्यांच्याच बाजूला षटकार कसा मारता? तेव्हा त्याचे उत्तर होते की अरे भाऊ, संपूर्ण स्टेडियममध्ये प्रेक्षक षटकारांची मागणी करायचे. मी कुठेही षटकार मारला की प्रेक्षकांना वाटायचे की त्यांच्या मागणीनुसार हे केले गेले. केवळ प्रेक्षकांच्या मागणीनुसार मी षटकार मारले असते तर प्रत्येक डावात मी ३००-४०० धावा केल्या असत्या. प्रेक्षकांनी माझ्यावर प्रेम केले, त्यामुळे त्यांच्या प्रेमाने मला चांगले खेळण्याची प्रेरणा दिली. इंग्लंड-विंडीजविरुद्धच्या ऐतिहासिक विजयाबद्दल ते म्हणाले होते की, हा सांघिक खेळ आहे, चांगला सर्व खेळाडूंनी मिळून केला पण त्याचे श्रेय मला मिळाले.

दुर्राणी जेव्हा खेळायचे तेव्हा कसोटीची मॅच फी ३०० रुपये होती. आजच्या क्रिकेटपटूंना अमाप पैसा आणि सोयीसुविधा मिळत आहेत, ही गोष्ट त्यांनी मनावर घेतली नाही. ते म्हणाला, आमच्या काळात क्रिकेटपटूंना तितकंसं मिळालं नाही हे खरं, पण प्रेक्षकांचं प्रेम तेव्हाही होतं, आजही आहे. मी स्वतः वर्षानुवर्षे स्कूटरवर फिरायचो पण मला याबद्दल काहीच तक्रार नाही. बीसीसीआयने ते केले आहे, काही संस्थाही करत आहेत. क्रिकेटमुळेच आम्ही विमानात बसलो हेही खरे आहे.

दुर्राणी यांनी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर १-६ जानेवारी १९६० रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी खेळली. ६-११ फेब्रुवारी १९७३ रोजी मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर इंग्लंडविरुद्ध अंतिम कसोटी खेळली गेली. त्यांनी पहिल्या डावात ७३ आणि दुसऱ्या डावात ३७ धावा केल्या.

त्यांनी १९५८ मध्ये सौराष्ट्र संघासोबत आपल्या रणजी करंडक कारकिर्दीची सुरुवात केली, परंतु नंतर उदयपूरच्या महाराणांनी बोलावल्यानंतर ते राजस्थानकडून खेळले. दुर्राणी दोन वर्षे देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज होते.

१३ वर्षांच्या कारकिर्दीत दुर्राणी यांनी तीन वेळा इंग्लंड (१९६७, १९७१, १९७४), वेस्ट इंडीज दोनदा (१९६२, १९७१) आणि प्रत्येकी एकदा ऑस्ट्रेलिया (१९६७) आणि न्यूझीलंड (१९६७) दौरा केला.

दिग्गज क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रिकेट जगतातील सर्व मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून लिहिले की, सलीम दुर्राणीजी क्रिकेटचे दिग्गज होते, स्वतःमध्ये एक संस्था होते. क्रिकेट जगतात भारताच्या उदयात त्यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या निधनाने दु:ख झाले आहे, त्यांच्या कुटुंबियांच्या आणि मित्रांच्या सहवेदनेत मी सहभागी आहे. त्यांनी पुढे म्हंटले की, मला त्यांना भेटण्याची अनेकवेळा संधी मिळाली. यापैकीच एकदा २००४ मध्ये जामनगर येथील एका कार्यक्रमात त्यांचा गौरव करण्यात आला होता. या कार्यक्रमात महान क्रिकेटपटू विनू मांकड यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्या आठवणी आजही ताज्या आहेत.

 

संवाद मीडिया*
🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

*👉नव्या युगातील करिअर्सचे एकमेव प्रवेशद्वार !*

*🖥️ MS-CIT 🖥️*

*🌍आंतरराष्ट्रीय दर्जाचा परिपूर्ण कंप्यूटर कोर्स*

*👨‍🎓जॉबची संधी नक्की… करिअरची दिशा पक्की !*👩‍🎓

*१० वी व १२ वी बोर्ड परीक्षेनंतरचा सुट्टीतील सर्वोत्तम अभ्यासक्रम घेऊन आलय*

*🖥️ SSI COMPUTER* 🖥️

*🔹Learn from Expert*

*उपलब्ध कोर्सेस*

*▪️MS-CIT*

*▪️MKCL English*
*Gateway to Job Success*

*▪️MKCL Tally with GST*
*Gateway to Knowledge Lit Careers*

*▪️Tally Prime*

*MKCL अधिकृत अध्ययन केंद्र*

*♦️आमची वैशिष्ट्ये*♦️

*♻️सतत 13 वर्ष जिल्ह्यातील नंबर 1 बेस्ट परफॉर्मिंग सेंटर*

*_♻️onset व NSDC सर्टिकाईड तंज्ञ प्रशिक्षक वर्ग_*👨🏻‍🏫🧑‍🏫

*_♻️मुलींसाठी स्वतंत्र्य बॅचेस_*👩‍💻

*_♻️जिल्ह्यातील एकमेव केंद्रशासनाच्या नियमानुसार 5 स्टार सुख-सुविधांसह उपलब्ध_* 5️⃣

*_♻️संपूर्ण वातानुकुलित व CCTV च्या निगराणित_*🆒

*_♻️सोयीनुसार बॅचेस उपलब्ध_*

*_♻️Digital classrom सह स्वतंत्र Practical व्यवस्था (एक विद्यार्थी एक संगणक)_*

*_♻️MSCIT / MKCL – IT/ Tally – Prime / KLIC English/c++/ Java course उपलब्ध_*

*_♻️देशात तसेच परदेशात आमचे विद्यार्थी कार्यरत_*

*पत्ता : SSI COMPUTER™, द्वारकानाथ कॉम्प्लेक्स, विठ्ठल मंदिर – फिश मार्केट रोड, सावंतवाडी*

*📲संपर्क :- 9420740740*

*Advt link …👇*

————————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा