You are currently viewing देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा  

देवघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा  

सिंधुदुर्गनगरी

देवघर धरणाच्या क्षेत्राच्या परिसरात होत असलेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची पातळी 179.50 मी. पेक्षा जास्त झाल्यास सांडव्यावरुन पाणी वाहणार आहे. तरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावांतील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी केले आहे.

            त्याचबरोबर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील घोणसरी, लोरे नंबर-1, लोरे नंबर-2, गडमठ, पियाळी, वाघेरी या गावांनी अधिक सतर्क रहावे. सदर गावात ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, मंडळ अधिकारी तसेच गावातील महत्वाच्या ठिकाणी दर्शनी भागात सूचना फलक लावावेत.

            रात्रीच्या वेळी नागरिकांनी नदी पात्रातून ये जा करु नये. नदीपात्रात कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या महिला, नदीपात्रात पाण्यासाठी गुरे सोडणारे शेतकरी यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. तालुक्यातील शोध व बचाव गटातील पोहणारे सदस्य यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तालुक्यातील शोध व बचाव साहित्य सज्ज ठेवावे. एखादी आपत्तीजनक स्थिती उद्भवल्यास त्या बाबत जिल्हा नियंत्रण कक्षास माहिती द्यावी.  अशा सूचना शुभांगी साठे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग यांनी दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twenty + six =