You are currently viewing विज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी तालुकानिहाय ग्राहक मेळावे आयोजित करावेत

विज ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी तालुकानिहाय ग्राहक मेळावे आयोजित करावेत

ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची अधीक्षक अभियंता यांच्याकडे मागणी.

वैभववाडी

जिल्ह्यातील वीज ग्राहकांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने तालुकानिहाय वीज ग्राहक मिळावे आयोजित करावेत अशी मागणीवजा विनंती अधीक्षक अभियंता,म.रा.वि.वि.कं. कुडाळ यांच्याकडे ग्राहक पंचायत महाराष्ट्र-सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने मेलद्वारे केली आहे. सदर मेलची प्रत जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग व कार्यकारी अभियंता, कणकवली यांना पाठविल्या आहेत.
विज ही प्राथमिक व मूलभूत गरज आहे.विजेचा वापर करणारा प्रत्येक नागरिक हा विज वितरण कंपनीचा विज ग्राहक आहे. जिल्ह्यातील विविध प्रकारच्या विज ग्राहकांच्या विविध प्रकारच्या समस्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या तालुका व जिल्हा शाखेकडे तोंडी व लेखी स्वरुपात आल्या आहेत, येत आहेत. संस्थेच्या माध्यमातून काही समस्या समन्वयातून सोडविल्या जात आहेत.
भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते ग्राहकतीर्थ स्व.बिंदुमाधव जोशी स्थापित ‘ग्राहक पंचायत महाराष्ट्र’ संस्था ग्राहक हा केंद्रबिंदू मानून कार्य करीत आहे. ग्राहकांचे संघटन, ग्राहकांचे प्रबोधन व ग्राहकांना योग्य मार्गदर्शन करून ग्राहकांचे हक्क, अधिकार आणि कर्तव्ये याबाबत जनजागृती व प्रबोधन करीत आहे. ‘ग्राहक राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ हे ब्रिद घेऊन ‘संवाद समन्वयात ग्राहक कल्याण’ या सुत्राने प्रशासनाचा सहकारी म्हणून संस्था कार्य करीत आहे. शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी संस्था प्रयत्नशील आहे.
वीज नियामक मंडळाच्या निर्देशाप्रमाणे ग्राहकांच्या समस्या निवारणार्थ दर महिन्याला ग्राहक मेळावा घेणे बंधनकारक असतानाही म.रा.वि.वि.कंपनीकडून ग्राहक मेळावे आयोजित केल्याचे दिसत नाहीत. तरी आपल्या विभागाकडून महिन्यातून किमान एक तालुकानिहाय विज ग्राहक मेळावा आयोजित करण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून वीज ग्राहक आणि कंपनी प्रशासन यांच्या समन्वयातून काही प्रश्न मार्गी लागतील आणि सर्वसामान्य वीज ग्राहकाला न्याय मिळण्यास मदत होईल. यामध्ये ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेची भूमिका समन्वयाची व मध्यस्थी म्हणून राहणार असून तालुका शाखांचे सहकार्य राहणार आहे.
काही अपवाद वगळता विज ग्राहकांच्या समस्या या नैसर्गिकपेक्षा मानवनिर्मित अधिक आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने-मीटर बंद असुनही विज बिल येणे, जास्त आलेले विजबिल रितसर करुन मिळणे, पैसे भरुनही विज मीटर न मिळणे, सरासरी विज बिल देणे, बिल वेळेत न मिळणे, कल्पना न देता वीज पुरवठा खंडित करणे, विजेच्या कमी-जास्त दाबामुळे होणारे नुकसान, पत्र देऊनही खराब पोल न बदलणे, काही कर्मचारी वर्गाचे ग्राहकांसोबत अयोग्य वर्तन व म.रा.वि.वि.कं. तालुका कार्यालयातील संपर्क क्रमांक बंद/नादुरुस्त आहेत. इत्यादी विविध प्रकारच्या समस्या आहेत.
म.रा.वि.वि.कंपनीने यावर सकारात्मक विचार करून योग्य कार्यवाही करावी अशी विनंती ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे राज्य सदस्य व जिल्हाध्यक्ष प्रा.श्री. एस. एन. पाटील, उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री. सिताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव श्री. संदेश तुळसणकर यांनी कंपनीकडे मेलद्वारे केली आहे.

Advertisement

_*प्रवेश सुरू ..! प्रवेश सुरू …!! प्रवेश सुरू ..!!!*_🏃‍♀️🏃‍♂️

*_♻️ ADMISSION OPEN ♻️_*

_*🏥 V P COLLEGE OF PHARMACY, MADKHOL*_

*_📕शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये 💊औषध निर्माणशास्त्र पदविका व पदवी 🏥 D.PHARM & B.PHARM प्रथम वर्ष अभ्यासक्रमाकरिता 🏥 प्रवेश घेण्याची सुवर्णसंधी !_*

*_👉 आमच्या संस्थेची वैशिष्ट्ये_*

*_📕🔭अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा व ग्रंथालय_*

*_🖥️अत्याधुनिक संगणक कक्ष, इंटरनेट सुविधा_*

*_👩🏻‍🏫अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग_*

*_👨🏻‍🎓माफक शैक्षणिक शुक्ल तसेच शिष्यवृत्ती सुविधा शासन निर्णयानुसार लागू_*

*_रजिस्ट्रेशन फॉर्म 📋भरून देण्याची मोफत सुविधा तसेच F.C. सेवा उपलब्ध*

*_🌴🏥🌴निसर्गरम्य माडखोल गावात, वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्ग. लगत सुसज्ज शैक्षणिक इमारत_*

_*प्रवेश प्रक्रिया व अधिक माहितीसाठी संपर्क*_

*📲9763824245 /9420196031*

*_👉पत्ता : व्हि.पी. कॉलेज ऑफ फार्मसी माडखोल, वेंगुर्ला-बेळगाव राज्यमार्गालगत ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग_*

*Advt link*

———————————————-
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा