रेडी भागातील 25 आशा ताईंना मातोश्री सेवा धाम ट्रस्टमुंबईतर्फे धान्याचे किट व मास्क वाटप

रेडी भागातील 25 आशा ताईंना मातोश्री सेवा धाम ट्रस्टमुंबईतर्फे धान्याचे किट व मास्क वाटप

जि.प.सदस्य प्रितेश राऊळ यांचा पुढाकार

रेडी
मातोश्री सेवाधाम ट्रस्ट मुंबईच्यावतीने रेडी प्राथमिक आरोग्य अंतर्गत मधील 25 आशाताईंना अन्नधान्याचे किट आणि मास्क प्रितेश राऊळ यांच्या पुढाकारने देण्यात आले.
यावेळी मातोश्री सेवाधाम ट्रस्टचे अध्यक्ष अमित बने, रेडी सरपंच रामसिंग राणे, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, शिरोडा उपसरपंच राहुल गावडे, रेडी प्राथमिक आरोग्य केद्रांचे डॉ. स्नेहा नवार, डॉ. शुक्ला मॅडम, मातोश्री सेवाधाम ट्रस्टचे मेम्बर रवि राणे, सुदर्शन राऊळ, आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. तसेच आशाताईंना पुढील 10 दिवसात रेनकोट देण्याचे आश्वासन मातोश्री सेवाधाम ट्रस्टच्यावतीने देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा