You are currently viewing सुकळवाड येथे एस. कृषी सेवा केंद्र आयोजित भातपीक पाहणी कार्यक्रम संपन्न

सुकळवाड येथे एस. कृषी सेवा केंद्र आयोजित भातपीक पाहणी कार्यक्रम संपन्न

मालवण:

 

सुकळवाड येथे शेतकऱ्यांसाठी एस. कृषी सेवा केंद्र आयोजित भात पीक पाहणी कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमावेळी मालवण पंचायत समिती कृषी अधिकारी संजय गोसावी, विस्तार अधिकारी के. टी. पाताडे उपस्थित होते.

तसेच परब ऍग्रो चे संचालक ऋषिकेश परब व काजवा कृषी सेवा केंद्राच्या संचालिका श्रेया उगवेकर उपस्थित होत्या.

यावेळी शेतकऱ्यांना कावेरी सिडचे मॅनेजर मिलिंद पवार यांनी कावेरीच्या 9090 हे हायब्रीड भात पिकाविषयी सखोल माहिती दिली.

या कार्यक्रमात सुनील पालकर यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात कावेरी सिड्स चे प्रतिनिधी शिवम आहिरे, सागर वराडकर, सुकळवाड सरपंच युवराज गरुड, जी. प. सदस्या माधुरी बांदेकर तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =