You are currently viewing वैभववाडी तालुक्यातील दोन प्राथमिक शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रजित नायर यांनी केला गौरव..

वैभववाडी तालुक्यातील दोन प्राथमिक शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रजित नायर यांनी केला गौरव..

वैभववाडी

कोरोना महामारी करूळ पोलिस चेक नाक्यावर प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील दोन प्राथमिक शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रजित नायर यांनी गौरव केला. शिक्षक भीमराव कांबळे व संजय चाफे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप डॉ. नायर यांनी दिली.

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रजित नायर हे रविवारी पुणे ते सिंधुदुर्ग असा प्रवास करत होते. या प्रवासात त्यांना या दोन शिक्षकांच्या कामाचा अनुभव आला. त्यांची बस करूळ चेक नाक्यावर रात्री 3 वा. आली. दरम्यान ड्युटीवर कार्यरत असणाऱ्या त्या कर्मचाऱ्यांनी बस थांबवली. डॉ. प्रदीप नायर यांना बस चालकाने आपल्या प्रवासाची नोंद करण्यास सांगितले. श्री नायर इतर प्रवाशांप्रमाणे मास्क लावून बसमधून खाली उतरले. कार्यरत असलेले शिक्षक भिमराव कांबळे व संजय चाफे तसेच आरोग्य विभागाचे प्रवीण भागवत यांनी त्यांच्या प्रवासाची नोंद केली.

रात्रीची वेळ असून देखील ते कर्मचारी प्रवाशांशी सौजन्याने वागत होते. कर्तव्यदक्ष पणे काम करणाऱ्या त्या शिक्षकांबद्दल त्यांना आदर वाटला. श्री. नायर प्रवासात मार्गस्थ झाले. एवढ्यावरच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर थांबले नाहीत. त्या कर्मचार्‍यांचे आदर्शवत काम समाजापुढे पोहोचावे यासाठी त्यांनी वैभववाडी तालुक्यातील यशवंत वि.मं. उंबर्डे नायदे कातकरवाडी या शाळेतील त्या दोन शिक्षकांना सिंधुदुर्गनगरी येथे बोलावून घेतले. श्री. नायर यांनी त्या दोन्ही शिक्षकांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. यावेळी वैभववाडी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्वच कर्मचारी व पर्यवेक्षीय अधिकारी चांगले काम करत असल्याने मागील दोन आठवड्यात कोवीड महामारीचा चांगला सामना करु शकलो. असेच यापुढे काम सर्वांनी केल्यास जिल्ह्या निश्चित कोरोनामुक्त होईल. असा विश्वास डॉ. नायर यांनी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 + one =