वेंगुर्ल्यात संजय पडते यांच्या हस्ते ग्राम विलगीकरण कक्षासाठी आमदार निधीतून १४० बेडचे लोकार्पण

वेंगुर्ल्यात संजय पडते यांच्या हस्ते ग्राम विलगीकरण कक्षासाठी आमदार निधीतून १४० बेडचे लोकार्पण

वेंगुर्ला :

आज मंगळवारी आमदार दिपक केसरकर यांनी वेंगुर्ले तालुक्यातील ग्राम विलगीकरण कक्षासाठी आमदार निधीतून १४० बेड दिले असून या बेडचे लोकार्पण शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या हस्ते करण्यात आले. प्राथमिक स्वरूपात या बेडचे वितरण तालुक्यातील १७ ग्रा. पं. ना करण्यात आले.

 

वेंगुर्ले तालुक्यात कोरोनोचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन शिवसेना पदाधिकारी यांच्या मागणीवरून आपल्या आमदार निधीतून वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामविलगीकरण कक्षासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रथमतः छोट्या गावासाठी ५ तर मोठ्या गावातील विलिगीकरण कक्षासाठी १० बेड उपलब्ध करून दिले.

 

यावेळी तालुका प्रमुख यशवंत परब, शहर प्रमुख अजित राऊळ, प्रभारी गट विकास अधिकारी विदयाधर सुतार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर, नितीन मांजरेकर, दाभोली सरपंच उदय गोवेकर, अजय नाईक, सुनिल डुबळे, सचिन वालावलकर, बाळा दळवी, पंकज शिरसाट, सुकन्या नरसुले, मंजुषा आरोलकर, सरपंच आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा