रेडी गावात ग्राम विलगीकरण कक्षाचे उद्घाटन

रेडी गावात ग्राम विलगीकरण कक्षाचे उद्घाटन

रेडी

रेडी ग्रामपंचायतीच्या ग्रामविलगिकरण कक्षाचे उद्घाटन सेंट्रल प्रायमरी स्कूल रेडी नं. १ येथे रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटरचे प्रमुख तथा सुप्रसिद्ध हृदयतज्ञ डॉ. विवेक रेडकर यांचे हस्ते सोमवारी करण्यात आले. हा विलगीकरण 16 बेडचा आहे.

यावेळी जि. प. सदस्य प्रितेश राऊळ, सरपंच रामसिंग राणे, तालुका आरोग्य अधिकारी अश्विनी माईणकर, डॉ. स्नेहा नवार, डॉ. रश्मी शुक्ला, डॉ. मोहन जगताप, गटविकास अधिकारी विद्याधर सुतार, आय.एल.पी.एल कंपनीचे व्यवस्थापक श्रीनिवासन, रेडी पोर्टचे संदीप चौहाण, ग्रा.वि अधिकारी प्रल्हाद इंगळे, विकी तोरस्कर, पुरुषोत्तम नायडू, रेडी तलाठी एस.एस.सोळंखी ,राजेंद्र कांबळी, ग्रामपंचायत सदस्य गायत्री सातोस्कर, संजय कांबळी, लक्ष्मीकांत भिसे, विनोद नाईक, शैलेश तिवरेकर, नंदकुमार मांजरेकर, आरोग्य व ग्रा. पं. कर्मचारी , ग्रामस्थ उपस्थित होते.

मिथिलीन ब्लू हे औषध कोरोना रुग्णासाठी उपयुक्त असुन यामुळे रुग्णांना लागणाऱ्या ऑक्सीजनची गरज कमी होते. त्यामुळे हे औषध कोरोना रुग्णासाठी उपयुक्त आहे. कोरोना रोखण्यासाठी रुग्ण सापडत असलेल्या वाड्या सील केल्या पाहिजेत. तरच रुग्ण वाढीचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. कोरोना गंभीर रुग्णांनी विनाविलंब हॉस्पिटल मध्ये दाखल व्हावे. असे डॉ. विवेक रेडकर यांनी सांगून गाव कोरोना मुक्त होण्यासाठी सर्वाच्या सहकार्याने प्रयत्न करुया. यासाठी लागणारे सहकार्य रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर तर्फे दिले जाईल असे डॉ. विवेक रेडकर म्हणाले. विलगीकरण कक्षातील रुग्णांच्या नाष्टा व जेवणाची सोय आमदार दिपक केसरकर तर्फे केली जाणार असल्याचे सरपंच राणे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा