You are currently viewing वरवडेच्या कामांमध्ये कमिशन कोण घेतो याचे आत्मपरीक्षण प्रकाश सावंत यांनी करावे

वरवडेच्या कामांमध्ये कमिशन कोण घेतो याचे आत्मपरीक्षण प्रकाश सावंत यांनी करावे

माजी सभापती असलेल्या प्रकाश सावंत यांना वरवडेत ग्रामपंचायत साठी दारोदार फिरावे लागले

 

युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांचे प्रकाश सावंत यांना जोरदार प्रत्युत्तर

 

कणकवली :

वरवडे गावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीबद्दल माजी सभापती प्रकाश सावंत यांनी बोलताना त्या इमारतीच्या कामातून टक्केवारी कुणी घेतली त्याचे अगोदर आत्मपरीक्षण करावे. सुशांत नाईक हे युवा सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून सक्षम काम करत असताना त्यांनी कुडाळ मतदारसंघांमध्ये फिरण्यापेक्षा प्रकाश सावंत यांनी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या महिला बाल रुग्णालयाची पाहणी करावी. त्यानंतर त्यांना नितेश राणे कसे अकार्यक्षम ठरले याचा अनुभव येईल. गेली तीस वर्ष सत्तेत असणाऱ्या राणेंना कणकवली मतदारसंघात महिला बाल रुग्णालय सुरू करता आले नाही. मात्र गेल्या पाच वर्षाच्या काळात आमदार वैभव नाईक यांनी जिल्ह्यातील एक आदर्शवत असे महिला बाल रुग्णालय कुडाळ मध्ये करून दाखवले. कुडाळ सह जिल्ह्यातील रुग्ण या रुग्णालयात कसे उपचार घेतात ते प्रकाश सावंत यांनी पहावे. त्यानंतर प्रकाश सावंत स्वतःच नितेश राणे अकार्यक्षम असल्याचे मान्य करतील. तसेच सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणे यांच्या स्टंटबाजीची केलेली चिरफाड जर प्रकाश सावंत यांना एवढी जिव्हारी लागत असेल तर प्रकाश सावंत यांनी बोगस काम करणाऱ्या ठेकेदाराचे नाव जाहीर करावे. आणि त्यांच्याच आमदारांना सांगून त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. ही हिम्मत प्रकाश सावंत हिम्मत दाखवतील काय? वरवडे मध्ये काम मंजूर झाल्यावर दहा टक्के दर कोणाचा चालू आहे? तेथे ठेकेदार कामे करायला का येत नाहीत याचे आत्मचिंतन प्रकाश सावंत यांनी करावे. अन्यथा कोणत्या कामांमधून कोणी। किती टक्केवारी घेतली ते सुद्धा येत्या काळात नावाने ही जाहीर करण्याची वेळ येईल. असा इशारा युवा सेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर यांनी दिला आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू असताना रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्ष झोपा काढत होते का? ते देखील प्रकाश सावंत यांनी जाहीर करावे. की रुग्ण कल्याण समिती अध्यक्षांसोबत सावंत यांची मिली भगत होती. माजी सभापती राहिलेल्या प्रकाश सावंत यांना त्यांच्या गावातील वरवडे ग्रामपंचायत च्या निवडणुकीत त्यांच्याच पक्षातील ताकदवान गटाने ग्रामपंचायतीसाठी गावात दारोदार फिरवले त्याचा देखील त्यांनी अभ्यास करावा. प्रकाश सावंत यांचे हे केवळ अर्धेच कारनामे बाहेर आले. यापुढे जर आमच्या नेत्यांवर व युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यावर त्यांनी टीका केली तर प्रकाश सावंत यांचे इतर कारनामे देखील बाहेर काढावे लागतील असा इशारा सचिन आचरेकर यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा