You are currently viewing माजी जि.प.उपाध्यक्ष अरीफ बगदादी यांना मातृशोक

माजी जि.प.उपाध्यक्ष अरीफ बगदादी यांना मातृशोक

देवगड

जि. प. चे माजी उपाध्यक्ष तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस अरीफ बगदादी यांच्या आई सुग्राबी जैनुद्दीन बगदादी ( वय 96, रा. गिर्ये ) यांचे वृद्धापकाळाने गिर्ये येथील राहत्या घरी 4 मे रोजी रात्री 9 वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चत 4 मुलगे, 3 मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. अत्यंत सुस्वभावी आणि मनमिळाऊ असलेल्या सुग्राबी यांच्या निधनाने बगदादी परिवारासह गिर्ये गावावर शोककळा पसरली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा