You are currently viewing सावंतवाडी येथील रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी येथील रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

समाजसेवक कै. बाळाभाई बांदेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शिबिराचे आयोजन

सावंतवाडी

सद्या कोरोनाच्या परिस्थितीमु़ळे रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असून रक्तपेढीमध्ये सामान्य रक्तगटाची एक रक्तबॅग मिळवणे रुग्णाच्या नातेवाईकांना मुश्किल होत आहे. याच पार्श्वभूमीवर रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी व युवा रक्तदाता संघटना, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सावंतवाडी काॅटेज रूग्णालय रक्तपेढी इथं सावंतवाडीतील समाजसेवक कै. बाळाभाई बांदेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होत. युवा रक्तदाता संघटनेचा माध्यमातून कोरोना काळातील हे ९ व रक्तदान शिबिर आहे. या शिबिरा दरम्यान, अनेकांनी रक्तदान करत उत्स्फूर्त प्रतिसाद देत सामाजिक बांधिलकी जपली.

यावेळी रो. संघाचे अध्यक्ष साईप्रसाद हवालदार,युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी, अँड. सिद्धांत भांबुरे, दिलीप म्हापसेकर, आनंद रासम, रमेश भाट, सुधीर नाईक, वसंत करंदीकर, नितीन हवालदार, पृथ्वीराज चव्हाण, तन्मय चव्हाण, युवा रक्तदाता संघटनेचे अनिकेत पाटणकर, मेहर पडते,अर्चित पोकळे,देवेश पडते, पार्थिल माठेकर,गौतम माठेकर, साईश निर्गुण, वर्धन पोकळे, संदीप निवळे, अभिजित गवस, डॉ. मुरली चव्हाण, राघु चितारी, सिद्धेश ढेकणे, वसंत सावंत, गौतम सावंत, मंदार सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × four =