भाजपाचे आंदोलन म्हणजे अपयश लपविण्याचा प्रयत्न

भाजपाचे आंदोलन म्हणजे अपयश लपविण्याचा प्रयत्न

शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांची टीका

सावंतवाडी
भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आणि सावंतवाडीचे नगराध्यक्ष परब यांनी आरोग्य विभागाच्या विरोधात केलेले आंदोलन म्हणजे आपले अपयश लपवण्याचा प्रकार आहे, भाजपने कोविड काळामध्ये कोविड केंद्र, विलगीकरण कक्ष व ऑक्सीजन कोविड सेंटर उभारण्याच्या घोषणा केल्या होत्या.आता नागरिक चर्चा करू लागले, त्यावर पडदा टाकण्याचा प्रकार आंदोलनातून करत असल्याची टीका शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केली आहे.

शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ म्हणाले, सावंतवाडीच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात भाजपाचे जिल्हाध्यक्ष तेली व नगराध्यक्ष परब यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले हे आपले अपयश लपवण्याचा प्रकार आहे. जनतेची दिशाभूल ते करत आहेत दुसऱ्या लाटेत तेली किंवा परब यांनी लोकांच्यासाठी कोणत्याही प्रकारची कामगिरी केली नाही त्यामुळे हे आंदोलन आहे

खासदार नारायण राणे हे कोलगाव येथे येणार होते हे माहीत असूनही नगराध्यक्ष परब यांनी त्यांना टाळण्यासाठी हे आंदोलन केल्याची चर्चा भाजपच्या दुसऱ्या गोटात होती. तेथे नगराध्यक्ष आणि त्यांचे सहकारी फिरकलेच नाही.आमदार रवींद्र चव्हाण यांची तळी उचलण्याचे काम नगराध्यक्ष परब करत असल्याने त्यांनी ही भूमिका घेतली असल्याची चर्चा भाजपच्या दुसर्‍या गटात आहे असे म्हणाले.तसेच भाजपचे खासदार नारायण राणेंनी पालकमंत्री,आमदार,खासदार यांच्यावर टिका करण्यापेक्षा ज्या महान व्यक्तींच्या नावे कोलगांव मध्ये ग्रामविलगीकरण कक्ष उभारला त्या पं.दिनदयाळ उपाध्याय यांनी केलेल्या कार्याबद्दल बोलले असते तरी चांगले होते.ज्यांनी भाजपचा पाया उभा केला त्या व्यक्तीबद्दल काही माहीती तरी आहे का राणेंना??? एका सामाजिक उपक्रमाचा शुभारंभ करताय त्यावेळी तरी राजकारण करायच सोडा अशा शब्दात राणे यांच्यावरही रूपेश राऊळ यांनी टीका केली.

सावंतवाडी नगर परिषदेने पहिल्या लाटेमध्ये सावंतवाडी शहरभर अग्निशामक बंबातून फवारणी करून कोरोना टाळण्याचा प्रयत्न केला. मोती तलावाच्या काठावर देखील कायम फवारणी होत होती मात्र दुसऱ्या लाटेत गाफील राहिले त्यांनी दुर्लक्ष केलं. बाजारपेठ आणि मोती तलावावर कोणतेही निर्बंध आणले नाहीत. त्यामुळे संसर्ग वाढला.शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात रूग्ण आढळले त्यामुळे आता रॅपिड किंवा अॅटिंजन तपासणी करण्याच्या गप्पा करत आहेत म्हणजे लोकांना वेठीस धरण्याचा प्रकार आता होत असल्याची टीका शिवसेना तालुकाप्रमुख राऊळ यांनी केली.
सावंतवाडी नगर परिषदेने विलगीकरण कक्ष नुकताच सुरू केला आहे त्यामध्ये शहरातील पॉझिटिव्ह रुग्णांची काळजी घेण्याची गरज आहे तसे न करता सरसकट रॅपिड किंवा अॅटिंजन तपासणी करणे चुकीचे आहे पॉझिटिव्ह रुग्ण शहरात फिरत आहेत त्यांचीच रॅपिड टेस्ट प्राधान्याने केली पाहिजे असे ते म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा