आंबोली -चौकुळ येथे चक्रीवादळाचा तडाखा; राष्ट्रवादीकडून मदतीचा हात

आंबोली -चौकुळ येथे चक्रीवादळाचा तडाखा; राष्ट्रवादीकडून मदतीचा हात

सावंतवाडी

आंबोली-चौकुळ ‌येथील काही भागात अतिवृष्टीचा तडाखा बसला. यातील नुकसानग्रस्त लोकांना राष्ट्रवादीचा माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला. राष्ट्रवादीचा २२ व्या वर्धापनदिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माध्यमातून नुकसानग्रस्तांना ताडपत्रीच वाटप करण्यात आले.

चौकुळ, चिखलव्हाळ बेरडकी आदी गावात तालुका राष्ट्रवादीचावतीनं हे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी यावेळी राष्ट्रवादी शहराध्यक्ष देवेंद्र टेंमकर, हिदायतुल्ला खान, दर्शना बाबर- देसाई, श्री. गावडे, संतोष जोईल आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा