You are currently viewing बांदा कट्टा कॉर्नर येथे चालकाने दारूच्या नशेत ट्रॅक्टर घुसवला दुकानात

बांदा कट्टा कॉर्नर येथे चालकाने दारूच्या नशेत ट्रॅक्टर घुसवला दुकानात

बांदा कट्टा कॉर्नर येथे चालकाने दारूच्या नशेत ट्रॅक्टर घुसवला दुकानात

बांदा.

आज सायंकाळी बांदा शहरात कट्टा कॉर्नर चौकात दारूच्या नशेत ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर चालवत असल्याने तो थेट ऐका दुकानात शिरून अपघातग्रस्त झाल्याची घटना घडली आहे.सुदैवाने याठिकाणी वर्दळ नसल्याने जीवितहानी टळली,मात्र ट्रॅक्टरखाली दुचाकी चिरडल्याने नुकसान झाले. हे प्रकरण तडजोडीने मिटविण्यात आले. बांदा परिसरात जीवन प्राधिकरणचे जलवाहिनीचे काम सुरु आहे. या कामासाठी ट्रॅक्टर शहरातून जातं होता. चालकाने अति मद्यप्राशन केल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्याने भरधाव वेगात ट्रॅक्टर थेट खताच्या दुकानात घुसवला. यात ट्रॅक्टरचे तसेच दुकानाचे नुकसान झाले. दुकान मालकाची दुचाकी ट्रॅक्टरखाली चिरडल्याने नुकसान झाले. या अपघाताची बांदा पोलिसात नोंद करण्यात आली नाही.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + fourteen =