वेंगुर्ला तालुक्यात विविध ठिकाणी कंटेन्मेंट झोन…..

वेंगुर्ला तालुक्यात विविध ठिकाणी कंटेन्मेंट झोन…..

सिंधुदुर्गनगरी

वेंगुर्ला शहरात वरची येथील म्युनिसिपल घर नं. 262 घराभोवतालचा 25 मीटर परिसर कंटेन्मेंट झोन, विजय देवदत्त बांदेकर यांचे घरापासून सावित्री नारायण वरसकर याच्या घरपर्यंतचा 100 मीटरचा परिसर बफर झोन दिनांक 17 सप्टेंबर 2020 पर्यंत, कुबलवाडा दत्तमंदिर येथिल घर नं. 185 घरासभोवतालचा (25 मीटर)परिसर कंटेन्मेंट झोन, व एकमुखी दत्त मंदिर ते  राम मंदिर रोडपर्यंत कुबलवाडा 100 मीटर परिसर बफर झोन दिनांक 14 सप्टेंबर 2020, खालची भटवाडी येथिल घर नं. 34/4 घराभोवतालचा 25 मीटर परिसर कंटेन्मेंट झोन व शैलेश मदन मराठे, यांच्या घरापासून जयवंत मराठे यांच्या घरापर्यतचा 100 मीटर परिसर बफर झोन दिनांक 15 सप्टेंबर 2020,आनंदवाडी येथील घर क्र. 103 घरासभोवतालचा 25 मीटर परिसर कंटेन्मेंट झोन व मधुकर बबन जाधव, यांच्या घरापासून सार्वजनिक शौचालय आनंदवाडी पर्यंतचा 100 मीटर परिसर बफर झोन दिनांक 14 सप्टेंबर 2020 पर्यंत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन व बफर झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
वेंगुर्ला तालुक्यात मौजे म्हापण- तेलीवाडी येथे कंटेन्मेंट झोन
वेंगुर्ला तालुक्यातील मौजे म्हापण- तेलीवाडी येथील घर नं. 1072 घरासभोवतालचा वर्तुळाकार 50 मीटर परिसर  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.
सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 13 सप्टेंबर 2020 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तूविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा