वडिलांचा वारसा जपत रोहित म्हापणकर यांनी केले ५२ कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

वडिलांचा वारसा जपत रोहित म्हापणकर यांनी केले ५२ कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.

वेंगुर्ला

वेंगुर्ला तालुक्यातील परुळे गावात सद्यस्थितीत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने सर्वत्र हाहाःकार माजविला आहे. याचा परिणाम सर्वसामान्य कष्टकरी कुटुंबांना होत आहे. यामुळे परुळे, गौतमनगर येथे ५२ कुंटूंबाच्या वाडीतही कोरोना रुग्ण आढळून आल्याने सद्यस्थितीत या ग्रामस्थांना रोजंदारीसाठी कुठे जाता येत नाही. त्यांना दोनवेळेच्या जेवणाची गैरसोय होऊ लागली आहे. ही बाब रोहित म्हापणकर यांना समजताच वडिल कै. सुनिल म्हापणकर यांच्या दातृत्वाचा वारसा पुढे चालवत या ५२ कुटूंबांना त्यांनी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. .

गोरगरिबांना मदतीला धावून जाणार्‍या वडिलांना वारसा पुढे चालवत परुळे गौतमनगर येथिल या ग्रामस्थांना हे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले, यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, परुळेबाजार उपसरपंच विजय घोलेकर, माजी सरपंच उदय दाभोलकर, ग्रामपंचायत सदस्य पप्पू पेडणेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा