You are currently viewing ४ दिवस धोक्याचे; सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रेड अॅलर्ट

४ दिवस धोक्याचे; सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत रेड अॅलर्ट

सिंधुदुर्गात ढगफुटीचा इशारा

 

सिंधुदूर्ग :

 

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून पुढील चार ते पाच दिवस राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत ही चार दिवस रेड अॅलर्ट घोषित करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाण्यासाठी रविवारी रेड अॅलर्ट जारी करण्यात आल्याचं मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसळीकर यांनी सांगितलं.

हवामान खात्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटीचा इशारा दिला आहे. त्यामुळे याठिकाणी २०० मिमीपेक्षा जास्त पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. तसे घडल्यास तौक्ते चक्रीवादळानंतर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नवे संकट ठरेल. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग परिसरात आपातकालीन प्रसंगाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची (NDRF) पथके तैनात करण्यात आली आहेत. त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + nineteen =