You are currently viewing अमरावती विभागात राबविणार स्पर्धा परीक्षा विषयक उपक्रम…..

अमरावती विभागात राबविणार स्पर्धा परीक्षा विषयक उपक्रम…..

*अमरावती विभागात राबविणार स्पर्धा परीक्षा विषयक उपक्रम…..*
विभागीय आयुक्त डॉ. निधी पांडे
==============
अमरावती

महाराष्ट्रातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावे यासाठी अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम या जिल्ह्यातील महाविद्यालयांमध्ये व शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा विषयक उपक्रम नियमितपणे राबविण्यात येतील. त्यासाठी अमरावतीच्या डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीचे सहकार्य घेऊन शेवटच्या घटकापर्यंत स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात येईल. या सर्व प्रकारात प्रशासन सर्व प्रकारचे सहकार्य करेल .असे प्रतिपादन अमरावती विभागाच्या विभागीय आयुक्त डाँ. निधि पांडे यांनी काल व्यक्त केले .
डॉ. पंजाबराव देशमुख अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी विभागीय आयुक्त डॉ. निधि पांडे यांची भेट घेऊन अमरावती विभागात विनामूल्य स्पर्धा परीक्षा कार्यशाळा घेणे तसेच शाळा शाळांमध्ये स्पर्धा परीक्षा जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी विभागीय आयुक्त यांना विनंती केली. त्यांनी ती विनंती मान्य केली असून या सत्रापासून अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये स्पर्धा परीक्षा विषयक उपक्रम सातत्याने राबविले जातील. या कामी डॉ
पंजाबराव देशमुख अकादमी सहकार्य करणार असून मानधन आकारणार नाही. डॉ. पंजाबराव देशमुख ही एक भारतातील प्रतिथयश संस्था असून या संस्थे मध्ये आतापर्यंत ३५० सनदी व राजपत्रित अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे .या अकादमीमार्फत शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना नाममात्र एक रुपया प्रतिदिन एवढ्या कमी शुल्कामध्ये मुलांना स्पर्धा परीक्षेचे धडे देण्यात येतात. या उपक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद असून दरवर्षी साधारणपणे ४३ हजार विद्यार्थी या उपक्रमांमध्ये सहभागी होतात .डॉ. निधि पांडे यांना हा उपक्रम चांगला वाटला असून अमरावती भागात हा उपक्रम राबवण्यासाठी आपण पुढाकार घेऊ असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले. त्याचबरोबर या पाचही जिल्ह्यातील विविध अधिकारी विविध शाळांमध्ये जाऊन स्पर्धा परीक्षा बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. काही निवडक कार्यक्रमात स्वतः विभागीय आयुक्त डॉ. निधि पांडे यांनी सहभागी होण्यास मान्यता दिली आहे .या उपक्रमाची सुरुवात येत्या 30 जूनपासून अमरावती येथून होत आहे. शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणे हा उपक्रम अतिशय चांगला असून सर्व तज्ञ लोकांनी हा उपक्रम उचलून धरलेला आहे .विभागीय आयुक्तांनी या कामी पुढाकार घेतल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केल्या जात आहे .
=============
प्रकाशनार्थ
प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक डॉ.पंजाबराव देशमुख अकादमी अमरावती 9890967003

 

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
———————————————

प्रतिक्रिया व्यक्त करा