You are currently viewing वेंगुर्ले-खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना “पीपीई कीट” प्रदान….

वेंगुर्ले-खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना “पीपीई कीट” प्रदान….

वेंगुर्ले

मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते व शास्त्रज्ञ डाॅ. दिलीप पवार यांच्या माध्यमातून व विश्व हिंदु परिषदेच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना पीपीई कीट प्रखंड – वेंगुर्ले चे अध्यक्ष अरुण गोगटे व महामंत्री आपा धोंड यांच्या हस्ते देण्यात आली.

ग्रामीण भागात आरोग्य सेवकांना विलगीकरण कक्षात जाताना तसेच स्वॅबटेस्ट घेताना पीपीई कीट अत्यावश्यक असताना शासनाकडून मुबलक प्रमाणात पीपीई कीटचा पुरवठा होत नव्हता, ही अडचण लक्षात घेऊन विश्व हिंदु परिषद प्रखंड – वेंगुर्ले च्या वतीने खानोली व वेतोरे आरोग्य केंद्रांना पीपीई कीट देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा