You are currently viewing पारंपरिक मश्चिमारांचे आंदोलन बाराव्या दिवशीही सुरुच…

पारंपरिक मश्चिमारांचे आंदोलन बाराव्या दिवशीही सुरुच…

मत्स्य विभागाचे दुर्लक्ष

मालवण

बंदी कालावधी असूनही समुद्रात सुरू असलेल्या एलईडी पर्ससीन मासेमारीवर मत्स्य विभागाकडून कारवाई होत नसल्याच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे जिल्हाध्यक्ष मिथुन मालंडकर यांच्या नेतृत्वाखाली पारंपारिक मच्छीमारांनी मालवण येथे सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयासमोर छेडलेले साखळी उपोषण आंदोलन आज बाराव्या दिवशीही सुरूच होते. कारवाई बाबत मत्स्य विभाग ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असे मालंडकर यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा