You are currently viewing १०० रुपयांत दिवाळी गिफ्ट या आठवड्यात होणार वितरीत

१०० रुपयांत दिवाळी गिफ्ट या आठवड्यात होणार वितरीत

जिल्हा पुरवठा अधिकारीआणि यांची माहिती; राज्य शासनाने जाहीर केलीय योजना

सिंधुदुर्गनगरी

राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या १०० रुपयात शिधा जिन्नस संच दिवाळी गिफ्ट अंतर्गत अंत्योदय, प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्डधारकांना हा संच मिळणार आहे. संबंधित कंत्रात दाराकडे याबाबतची मागणी पुरवठा विभागाने नोंदवली आहे. हे संच या आठवड्यात उपलब्ध झाल्यानंतर त्याचे वाटप सुरू होणार आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा विभागकडून देण्यात आली.

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, केशरी एपीएल शेतकरी शिधापत्रिकाधारकांना आगामी दिवाळी सणानिमित्त नियमित अन्नधान्य व्यतिरिक्त शिधा जिन्नस संच उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे. संबंधित पात्र शिधापत्रिकाधारकांना शिधा जिन्नस संच प्रति शिधापत्रिका इ पॉस प्रणाली द्वारे शंभर रुपये दराने वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी आवश्यक शिधा जिन्नस संचाची मागणी त्वरित महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह कंजुमर्स फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्याकडे करावयाची आहे. त्यानुसार जिल्हा निहाय शिधा जिन्नस संच कंत्राटदार, संबंधित तालुका गोदामा पर्यंत पोहोचविणार आहे. संचात समाविष्ट शिधा जिन्नस एफ एस एस आय मानकाची पूर्तता करीत असल्याचे एन ए बी एल अधिसिकृत प्रयोगशाळेचे प्रमाणपत्र कंत्रात दाराकडून प्राप्त करून घेऊन त्यानंतर शिधा जिन्नस संच स्वीकारण्यात यावेत. कोणत्याही परिस्थितीत निकृष्ट दर्जाचे शिधा जिन्नस संच स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यायची आहे. कंत्राटदाराकडून तालुका गोदामात शिधा जींन्नस संच प्राप्त झाल्यावर जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, उपनियंत्रक यांनी स्वतः अथवा तहसीलदारांपेक्षा कमी दर्जा नसलेल्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून सिधाजिन्नस संचाचे कंत्राटदारांच्या प्रतिनिधी समोर नमुने गोळा करावेत .या नमुन्याची एन बी एस एल अधिसिकृत प्रयोगशाळेत तपासणी करावी तपासणी नमुना विहीत निकषाची पूर्तता करीत नसल्याचे आढळल्यास पुरवठादार यास तात्काळ अवगत करून संबंधित शिधा जिन्नस संचाचा साठा बदलून घेण्याबाबत कार्यवाही करायची आहे.
सुटे जिन्नस मिळणार नाही,
उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रत्येक शिधा जिन्नस संचात रवा, हरभरा डाळ, साखर व पाम तेल हे सिधा जिन्नस समाविष्ट असून प्रत्येक पात्र शिधापत्रिकाधारकास प्रति शिधापत्रिका एक संच वितरित करणे अनिवार्य आहे. कोणत्याही परिस्थितीत संचातील सिधा जिन्नस सुटे करून वितरित केले जाणार नाहीत याची संबंधितांनी दक्षता घ्यावी. अश्या सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हा पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यात २ लाख ३३ हजार ७६७ शिधापत्रिका धारक
जिल्ह्यातील एकूण २ लाख ३३ हजार ७६७ शिधापत्रिका धारकामध्ये २१ हजार २६० लाभार्थी स्वेत शिधा पत्रिका आहेत ते वगळता अन्य शिधा पत्रिका धारकाना या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये अंत्योदय २२,९१७ लाभार्थी,१,५३,५४४ प्राधान्यकुटुंब लाभार्थी, तर ३६,०४६ केसरी कार्ड धारक आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा