डेगवे गावात आज पासून १९ जूनपर्यत जनता कर्फ्यू

डेगवे गावात आज पासून १९ जूनपर्यत जनता कर्फ्यू

सावंतवाडी

कोरोनाचे संक्रमण रोखण्याठी डेगवे गावात १२ जून ते १९ जूनपर्यत सात दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. या काळात दवाखाना, अौषध दुकाने वगळता सर्व दुकाने, आस्थापना बंद राहणार आहेत. दुकाने, आस्थापना सुरु ठेवल्यास पाच हजाराचा दंड ठोठावण्यात येणार आहे. स्थानिक दुध विक्रेते यांना सकाळी ७ ते ८ आणि रात्री ७ते आठ यावेळेत सवलत देण्यात आली आहे.

विनाकारण मास्कशिवाय फिरणारया ५००रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. शेतीच्या कामा’ना सवलत ठेवण्यात आली आहे. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातील कर्मचारयाना ये जा करण्यासाठी सुट राहणार आहे.सरपंच वैदही देसाई, उपसरपंच प्रविण देसाई, ग्रा. प. सदस्य, तसेच कोरोना नियंत्रण समितीचे मधु देसाई, मंगलदास देसाई, सुनिल देसाई , ग्रामसेवक प्रभु आदीच्या उपस्थित झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. ग्रामस्थानी सहकार्य करण्याचे आवाहन डेगवे ग्रामपंचायतीने केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा